शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

जनतेचा विकास हाच ध्यास हवा : प्रदीप कंद

By admin | Updated: August 23, 2015 20:40 IST

शिरसगाव काटा : राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करून जनतेचा विकास हाच ध्यास ठेवला, तरच तुम्ही जनतेच्या मनात स्थान मिळवू शकता, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी केले. ते शिरसगाव काटा येथे विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

शिरसगाव काटा : राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करून जनतेचा विकास हाच ध्यास ठेवला, तरच तुम्ही जनतेच्या मनात स्थान मिळवू शकता, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी केले. ते शिरसगाव काटा येथे विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.
येथील जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब कोळपे यांच्या जिल्हा परिषद निधीतून केलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, अंतर्गत रस्ते व सुमारे ४ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन कंद यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे हे होते.
या वेळी पाचर्णे म्हणाले, की सध्या शिरूर तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु डिंभा धरणातून घोडमध्ये, तसेच चासकमानचेही टेलपर्यंत पाणी सोडावे, अशी मागणी आम्ही वरिष्ठ अधिकार्‍यांकडे केली आहे. याप्रसंगी अनेक ग्रामस्थांनी आमदारांकडे टँकरची मागणी केली. यावर त्वरित टँकरसाठी तहसीलदार यांच्याकडे प्रस्ताव पाठवावेत, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती सिद्धार्थ कदम, उपसभापती मंगल लंघे, दादासाहेब फराटे, शिक्षण विस्तार अधिकारी बाळकृष्ण कळमकर, पंचायत समिती सर्व शिक्षाअभियानाचे शाखा अभियंता अतुल पिसाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब कोळपे, सरपंच मनीषा कोळपे, उपसरपंच मोहन धुमाळ व ग्रामस्थ उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष परदेशी यांनी केले. मच्छिंद्र इंगळे यांनी आभार मानले.
फोटो ओळ -: शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील आरोग्य उपकेंद्र व विविध विकासकामांचे उद्घाटन करताना आमदार बाबूराव पाचर्णे व जि.प.अध्यक्ष प्रदीप कंद व इतर मान्यवर.