शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

पेट्रोल-डिझेल भाववाढ होऊनही इंडियन आॅइलचा नफा १५ हजार कोटींनी घटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 07:15 IST

भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन आॅइल या भारतातील तीन मोठ्या कंपन्या आहेत.

ठळक मुद्देक्रुड आॅईलच्या दरातील चढ-उतार : डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन

विशाल शिर्के 

पिंपरी : आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आॅइलच्या दरातील चढ-उतार, डॉलरच्या तुलनेतील रुपयाचे अवमूल्यन कारणांमुळे इंडियन आॅईलचा  नफा २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये तब्बल १५ हजार ५८१ कोटी रुपयांनी घटून तेराशे कोटी रुपयांपर्यंत घसरला आहे. चौथ्या तिमाहीअखेर पाच हजार कोटींचा तोटा झाल्याचे इंडियन आॅइल कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

कंपनीने  गेल्या आर्थिक वर्षातील ताळेबंद जाहीर केला आहे. लॉकडाऊनमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड आॅइलचे दर शून्यावर गेले होते. त्यावेळीदेखील देशातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी झाले नव्हते. उलट घटलेल्या महसुली उत्पादनाची तूट भरून काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने करवाढ केली असून, पेट्रोलियम कंपन्या १ जूनपासून दररोज इंधानाच्या भावात वाढ करीत आहे. त्याचा प्रभाव जून २०२० पर्यंत संपणाºया तिमाहीच्या ताळेबंदमध्ये जाणवेल. 

भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन आॅइल या भारतातील तीन मोठ्या कंपन्या आहेत. इंडियन आॅइलचा भांडवली बाजारातील वाटा सुमारे पन्नास टक्के आहे. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात ८९.९६९ दशलक्ष टन पेट्रोलियम पदार्थांची  विक्री केली.  ८१.७१ दशलक्ष टन देशांतर्गत खप आहे. यातून ५ लाख ६६ हजार रुपयांचे महसुली उत्पन्न मिळविले आहे. गेल्या वषीर्पेक्षा ३८ हजार ९८२ कोटी रुपयांची घट आहे. निव्वळ नफ्यात १५ हजार ५८१ कोटींनी घट झाली आहे. गेल्या वर्षी क्रूड खरेदीदर आणि विक्री दरामध्ये कमी तफावत असल्याने आणि अधिक परदेशी चलन खर्ची पडल्याने नफ्यात मोठी घट झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या अवमूल्यन या प्रमुख कारणांसह इतर घटकांमुळे २०१९-२० या काळात तब्बल ४,१४५.५३ कोटी रुपयांचा तोटा झाला. त्यापूर्वीच्या (२०१८-१९) वर्षात हा तोटा १,७४०.९४ कोटी रुपये होता. 

 

कंपनीचा निव्वळ नफा (कोटींमध्ये)

२०१७-१८ २१,३४६

२०१८-१९ १६,८९४

२०१९-२० १,३१३

असा होतो इंधन आणि दर प्रवास

क्रूड आॅइल जहाजामधून रिफायनरी कंपनीमध्ये पोहचल्ली प्रक्रिया होण्यासाठी ४५ ते ६५ दिवसांचा कालावधी लागतो. क्रूड आॅइलच्या किंमती दररोज बदलत असतात. रिफायनरी दरातील तफावत २०१९-२० या आर्थिक वर्षात प्रतिबॅरल ०.०८ डॉलर होती. तर, २०१८-१९ मध्ये हीच तफावत ५.४१ डॉलर होती. त्यामुळे त्या आर्थिक वर्षात कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ झाली. तर, यंदा नफा मोठ्या प्रमाणावर घटला.

टॅग्स :PuneपुणेPetrolपेट्रोलDieselडिझेल