शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सॉर बोर्डाची परवानगी असूनही हरयाणात 'पद्मावत'च्या प्रदर्शनावर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 15:46 IST

दीपिका पादुकोण, शाहीद कपूर आणि रणवीर सिंह यांची मुख्य भूमिका असलेल्या 'पद्मावत' चित्रपटाच्या प्रदर्शनाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदिल दाखवला असला तरी हरयाणात हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही.

ठळक मुद्देकायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका असल्याचे कारण देऊन हरयाणा सरकारने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाचे पद्मावती हे मूळ नाव बदलल्यानंतरही या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गातील अडचणी दूर झालेल्या नाहीत.

चंदीगड - दीपिका पादुकोण, शाहीद कपूर आणि रणवीर सिंह यांची मुख्य भूमिका असलेल्या 'पद्मावत' चित्रपटाच्या प्रदर्शनाला सेन्सॉर बोर्डाने हिरवा कंदिल दाखवला असला तरी हरयाणात हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. हरयाणातील मनोहरलाल खट्टर सरकारने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाचे पद्मावती हे मूळ नाव बदलल्यानंतरही या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गातील अडचणी दूर झालेल्या नाहीत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका असल्याचे कारण देऊन हरयाणा सरकारने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली. 

करणी सेनेची सरकारला उघड धमकी पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनासंबंधी सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये ठरलेला तडजोडीचा फॉर्म्युला करणी सेनेने फेटाळून लावला आहे. चित्रपटावर बंदी घालण्याच्या आपल्या मागणीवर करणी सेना ठाम आहे. करणी सेनेने सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला इशारा दिला आहे. पद्मावती चित्रपट प्रदर्शित झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीच करणी सेनेने दिली आहे. 

सेन्सॉर बोर्डाच्या सूचनेनुसार चित्रपटात काही बदल करण्यात येणार आहेत पण करणी सेनेला हे बदल मान्य नाहीत. या चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीवर ते ठाम आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जे काही होईल त्याला भाजपा सरकार आणि सेन्सॉर बोर्ड जबाबदार असेल अशी उघड धमकी करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांनी दिली आहे. चित्रपट सुरु होण्याआधी एक डिस्केलमर दिसेल. त्यावर चित्रपट काल्पनिक असल्याचा संदेश असेल. संजय लीला भन्साळींचा चित्रपट जसा काल्पनिक आहे तसेच आम्ही चित्रपटगृहात जेव्हा फुले उधळू ते सुद्धा काल्पनिकच असेल असे सुखदेव सिंह गोगामेडी म्हणाले.  

टॅग्स :Padmavatपद्मावतPadmavatiपद्मावती