मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ; मद्य घोटाळा प्रकरणात दाखल होणार मनी लॉन्ड्रिंगंचा खटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 14:28 IST2022-08-21T13:40:26+5:302022-08-21T14:28:12+5:30
सीबीआयने या प्रकरणातील सर्व कागदपत्रे ईडीकडे सोपवली आहेत.

मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ; मद्य घोटाळा प्रकरणात दाखल होणार मनी लॉन्ड्रिंगंचा खटला
नवी दिल्ली: दिल्लीतील मद्य घोटाळ्यात प्रमुखी आरोप असलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सिसोदियांविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी झाल्यानंतर आता मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल होणार आहे. सीबीआयने (CBI) या प्रकरणी ईडीकडे (ED) कागदपत्रे सोपवली आहेत.
सीबीआयने एफआयआरची प्रत आणि मद्य घोटाळ्याशी संबंधित इतर कागदपत्रे अंमलबजावणी संचालनालयाकडे सुपूर्द केली आहेत. त्यामुळे आता सिसोदियांवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू झाली आहे. याआधी सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 14 जणांविरुद्ध लुक आउट सर्कुलर जारी केली होती. सीबीआयने ज्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे, त्यांची नावे यात आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात लुक आऊट सर्कुलर जारी झाल्यानंतर ते म्हणाले की, 'ही काय नौटंकी आहे? मी दिल्लीत बिनधास्त फिरतोय, सांग कुठे येऊ? सीबीआयच्या छाप्यात काहीही सापडलं नाही, पण लुक आऊट नोटीस जारी करण्यात आल्याने मला आश्चर्य वाटतंय. मोदींनी छापेमारी करण्यापेक्षा महागाई आणि बेरोजगारीचा विचार करावा. माझ्या घरून एक पैसाही मिळाला नाही, ऑफिसच्या फाईल्स घेतल्या आहेत.'