मनीष सिसोदियांच्या प्रकृतीत बिघाड, हॉस्पिटलमध्ये केलं दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 15:59 IST2018-06-18T15:59:57+5:302018-06-18T15:59:57+5:30
उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे.

मनीष सिसोदियांच्या प्रकृतीत बिघाड, हॉस्पिटलमध्ये केलं दाखल
नवी दिल्ली- आयएएस अधिकाऱ्यांचा अघोषित संप मिटवावा या मागणीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. नायब राज्यपालांच्या निवासस्थानामध्ये सुरू असलेलं हे ठिय्या आंदोलन आज सोमवारी आठव्या दिवशीही कायम आहे. केजरीवाल यांच्यासह आंदोलनाला बसलेले उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे. मनिष सिसोदिया यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली आहे. सिसोदिया यांच्या रक्तातील किटॉनची पातळी ७.४ पर्यंत पोहोचली आहे. सामान्यतः ही पातळी शून्य असायला हवी. ही पातळी २ पेक्षा जास्त असेल तरीही धोक्याचा इशारा मानला जातो. डॉक्टरांनी एलजी हाऊस जाऊन सिसोदिया यांची तपासणी केली. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
दरम्यान, याआधी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची तब्येत बिघडली . त्यांना रविवारी रात्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी धरणं आंदोलन करत आहे. त्यांच्या आंदोलनाचा आजचा आठवा दिवस आहे. मात्र. या आंदोलनात सहभागी झालेले आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची रविवारी रात्री तब्येत बिघडली. यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, सत्येंद्र जैन यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा होईपर्यंत त्यांना रुग्णालयातच थांबावे लागणार आहे. सध्या त्यांना ग्लुकोज देण्यात येत आहे.
Manish Sisodia being shifted to hospital https://t.co/3LdQe3jG3z
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) June 18, 2018