समतासारख्या पतसंस्थांमुळे ठेवीदारांचा विश्वास
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:36+5:302015-02-18T00:13:36+5:30
राहुरी : सर्वसामान्य माणसाला व्यापारामध्ये चालना मिळण्यासाठी समतासारख्या पतसंस्थांनी केलेले काम कौतूकास्पद आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले़

समतासारख्या पतसंस्थांमुळे ठेवीदारांचा विश्वास
- ाज्य शासनाशी करारमुंबई - मुंबईतील वाहतुकीची कोंडी सोडवून रस्ते सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी जगविख्यात उद्योगपती मायकल ब्लुमबर्ग यांच्या ब्लुमबर्ग फिलॉन्थ्रॉफिस्ट फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. ब्लुमबर्ग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आज या संबंधीचा पाच वर्षांचा सामंजस्य करार झाला. या करारांतर्गत ब्लुमबर्ग हे मुंबईला १०० कोटी रुपयांची मदत देणार आहेत. जगात प्रत्येक मिनिटाला दोन व्यक्ती रस्त्यावरील अपघातात मरण पावतात. दरवर्षी १.२५ कोटी लोकांचा बळी जातो. अशावेळी रस्ते सुरक्षेवर आपण भर दिला असल्याची भावना मायकल ब्लूमबर्ग यांनी यावेळी व्यक्त केली. ब्लूमबर्ग फाऊंडेशनच्या सहकार्याने मुंबईची रस्ते सुरक्षा अव्वल दर्जाची होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. जगातील २० शहरांकडून रस्ते सुरक्षा नियोजनाचे प्रस्ताव फाऊंडेशनने मागविले होते. त्यापैकी १० प्रमुख शहरांची निवड करण्यात आली. त्या अंतर्गत मुंबईची रस्ते सुरक्षा, पायाभूत सुविधा, वाहतुकीचे नियोजन यासाठी मदत आणि जागतिक कीर्तीच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. या कराराच्या वेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, खा.पूनम महाजन, फाऊंडेशनचे संचालक डॉ.केली हेन्निंग, महापालिका आयुक्त सीताराम कुंटे, पोलीस आयुक्त राकेश मारिया आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनीवास यांनी मुंबईच्या पुढील पाच वर्षांच्या वाहतूक सुरक्षेचे सादरीकरण केले. (विशेष प्रतिनिधी)