कुत्र्याचा राग करणा-या मुलाशी लग्नास नकार

By Admin | Updated: September 13, 2016 18:33 IST2016-09-13T18:33:47+5:302016-09-13T18:33:47+5:30

लग्नात हुंडा मागितला म्हणून किंवा सासरी शौचालय नाही या कारणांवरून मुलींनी लग्न करण्यास नकार दिल्याच्या घटना आपण आत्तापर्यंत ऐकल्या आहेत.

Denial of marriage to a dog who is angry with the dog | कुत्र्याचा राग करणा-या मुलाशी लग्नास नकार

कुत्र्याचा राग करणा-या मुलाशी लग्नास नकार

ऑनलाइन लोकमत

बंगळुरू,दि.13- लग्नात हुंडा मागितला म्हणून किंवा सासरी शौचालय नाही या कारणांवरून मुलींनी लग्न करण्यास नकार दिल्याच्या घटना आपण आत्तापर्यंत ऐकल्या आहेत. मात्र कुत्रा आवडत नाही म्हणून लग्नाला कोणी नकार दिल्याचं एकलंय? आश्चर्य वाटत असेल ना...पण असं खरंच घडलंय. 

मुळ बंगळुरूची असलेली मात्र सध्या गुडगावमध्ये कार्यरत असलेल्या करिष्मा वालियाने कुत्रा आवडत नसल्याने लग्नाला नकार दिल्याची घटना घडली आहे.करिष्माचं दिल्लीच्या एका मुलासोबत लग्न ठरलं होतं.

मात्र , लग्नानंतर घरी कुत्रा आलेला मला आवडणार नाही शिवाय माझ्या आईलासुद्धा कुत्रे आवडत नाही असं मुलाने तिला सांगितल्यावर मुलीने थेट लग्नालाच नकार दिला. घेतलेल्या निर्णयावर विचार कर असं मुलाने सांगितल्यावरही ही मुलगी निर्णयावर ठाम राहिली.  तिच्या निर्णयामुळे मुलगा जरा गोंधळला व रागाच्या भरात त्याने कुत्र्यासोबतंच लग्न करण्याचा सल्ला तिला दिला.

Web Title: Denial of marriage to a dog who is angry with the dog