शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

घराणेशाही जपणाऱ्या पक्षांकडून लोकशाहीचे रक्षण होणार नाही, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 06:40 IST

विरोधकांचा संविधान दिन कार्यक्रमावर बहिष्कार...

नवी दिल्ली : घराणेशाही जपणाऱ्या व एकाच कुटुंबाकडून पिढ्यानपिढ्या चालविल्या जाणाऱ्या पक्षांचा कारभार लोकशाही पद्धतीने चालत नाही. अशा पक्षांकडून लोकशाही व्यवस्थेचे संरक्षण होण्याची अपेक्षा करता येणार नाही, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता केली. संविधान (राज्यघटना) दिनानिमित्त संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमावर काँग्रेससह १५ विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला होता.

या बहिष्काराचा थेट उल्लेख न करता मोदी म्हणाले की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली राज्यघटना देशाने स्वीकारली तो दिवस दरवर्षी राज्यघटना दिन म्हणून साजरा केला जातो. असा दिवस साजरा करण्याची गरज काय, असा प्रश्न विचारणाऱ्यांची मते आता देशातले नागरिक ऐकून घेण्यास तयार नाहीत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नजर टाकली तर लक्षात येईल की, देश एका संकटातून जात आहे. ही स्थिती घराणेशाही जोपासणाऱ्या पक्षांमुळे निर्माण झाली आहे. राज्यघटनेवर नितांत श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ही चिंतेची बाब आहे.राज्यघटना दिन साजरा करण्याचा निर्णय घेतल्यावर काही लोकांनी आमच्यावर टीका केली. डाॅ. आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली. त्या भव्य कामगिरीशी या दिवसाचा संबंध आहे, हे टीका करणाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, प्रजासत्ताक दिनाप्रमाणेच २६ नोव्हेंबरला राज्यघटना दिन पाळण्याची प्रथा यापूर्वीच सुरू झाली असती, तर अधिक चांगले झाले असते.

भ्रष्टाचाऱ्यांचे उपद्व्याप विसरू नकानरेंद्र मोदी म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या, शिक्षा सुनावण्यात आलेल्या लोकांचे उपद्व्याप विसरणे, त्यांची स्तुती करणे अयोग्य आहे. सार्वजनिक जीवनात अशा गोष्टींपासून प्रत्येकाने लांब राहिले पाहिजे. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेले नागरिक तसेच हुतात्मा झालेले पोलीस यांना मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीConstitution Dayसंविधान दिनcongressकाँग्रेस