Corona: 'अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट 40-60 टक्के जास्त धोकादायक'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 02:50 PM2021-07-19T14:50:23+5:302021-07-19T14:51:22+5:30

Corona variant: जगातील 80 पेक्षा जास्त देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंट पसरला आहे.

delta variant spreads 40 to 60 percent faster than alpha variant | Corona: 'अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट 40-60 टक्के जास्त धोकादायक'

Corona: 'अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट 40-60 टक्के जास्त धोकादायक'

Next
ठळक मुद्देडेल्टा प्लस व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटच्या तुलने अधिक धोकादायक आहे

नवी दिल्ली: कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट, कोरोनाच्या अल्फा व्हेरिएंटपेक्षा 40-60 टक्के जास्त वेगाने पसरतो. हा दावा भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स कंसोर्टियम (INSACOG) चे सह-अध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांनी केला आहे. तसेच, आज आढळणाऱ्या नवीन कोरोना रुग्णांपैकी 80 टक्के रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळतो, अशी माहितीही त्यांनी दिली.

डॉ. अरोरा पुढे सांगतात की, "कोरोनाचा डेल्हा व्हेरिएंट अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत 40-60 टक्के अधिक वेगाने पसरतो. तसेच, यूके, यूएसए, सिंगापुरसह 80 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा हाच व्हेरिएंट असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच, भारतात सध्या उपलब्ध असलेल्या कोरोना व्हॅक्सीन या डेल्टा व्हेरिएंटवर प्रभावी असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या राज्यांत डेल्टा प्लस व्हेरिएंट
डॉ. अरोरा यांनी पुढे सांगितले की, डेल्टा प्लस व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटच्या तुलने अधिक धोकादायक आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट -AY.1 आणि AY.2 आतापर्यंत महाराष्ट्र, तमिळनाडू आणि मध्यप्रदेशासह 11 राज्यात आढळला आहे. सध्या या व्हेरिएंट अभ्यास सुरू आहे. दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत सांगताता डॉ. अरोरा म्हणाले की, लसीकरण वाढवून आणि कोरोना नियमांचे पालन करुन कोरोनाची तिसरी लाट रोखता येईल.
 

Web Title: delta variant spreads 40 to 60 percent faster than alpha variant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.