शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टाने JNUचा विद्यार्थी शर्जील इमामचा जामीन अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 15:09 IST

शर्जील इमामला 13 डिसेंबर 2019 ला जामिया मिलिया इस्लामियामध्ये कथितरित्या आक्षेपार्ह भाषण दिल्याप्रकरणी अटक झाली होती. तसेच, 28 जानेवारी 2020 पासून तो न्यायालयीन कोठडीत आहे.

नवी दिल्ली:दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी शर्जील इमामचा जामीन अर्ज साकेत कोर्टाने फेटाळला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा(CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी(NRC)च्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान कथितरित्या आक्षेपार्ह भाषण दिल्याचा शर्जील इमामवर आरोप आहे. 

यापूर्वीच्या सुनावणीत दिल्ली पोलिस म्हणाले होते की, यूएपीए अंतर्गत राजद्रोहाच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला जेएनयूचा विद्यार्थी शर्जील इमामने त्याच्या कथित प्रक्षोभक भाषणांद्वारे मुस्लिमांमध्ये निराशेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. तर, शर्जील इमामने या प्रकरणात जामीन अर्ज दाखल करताना गेल्या सुनावणीत म्हटले होते की, त्याच्या बोलण्यामुळे हिंसा झाल्याचा कोणताही पुरावा नाही किंवा त्याने कोणालाही हिंसा करण्यास प्रवृत्त केले नाही.

'भाषणामुळे हिंसाचार झाला नाही'जामीन अर्जात शर्जील इमामने दावा केला होता की, त्याने कोणत्याही निदर्शनादरम्यान कधीही हिंसाचारात भाग घेतला नाही. तो शांतताप्रिय नागरिक आहे. सुनावणीदरम्यान इमामचे वकील तन्वीर अहमद मीर यांनी न्यायालयात त्याच्या भाषणातील उतारे वाचले आणि ते देशद्रोहाच्या कायद्याखाली येत नाहीत, असा युक्तीवाद केला.

शर्जीलला का अटक झाली ?13 डिसेंबर 2019 रोजी जामिया मिलिया इस्लामियामध्ये केलेल्या कथित भाषणाबद्दल शर्जील इमामला अटक करण्यात आली होती. त्याने 16 डिसेंबर रोजी अलीगढ मुस्लिम विद्यापीठात आसाम आणि ईशान्य भारतातील भाग कापून टाकण्याची धमकी दिली होती. तो 28 जानेवारी 2020 पासून न्यायालयीन कोठडीत आहे.

टॅग्स :delhiदिल्लीdelhi violenceदिल्लीCourtन्यायालय