दिल्ली दंगलीतील आरोपी शाहरुख पठाणला जामीन, पोलिस कर्मचाऱ्यावर रोखी होती पिस्तूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 22:01 IST2025-03-07T22:00:52+5:302025-03-07T22:01:45+5:30
Delhi Violence : शाहरुखच्या वडिलांची खालावल्याने न्यायालयाने हा दिलासा दिला आहे.

दिल्ली दंगलीतील आरोपी शाहरुख पठाणला जामीन, पोलिस कर्मचाऱ्यावर रोखी होती पिस्तूल
Delhi Violence : 2020 च्या दिल्ली दंगल प्रकरणातील आरोपी शाहरुख पठाणला दिल्लीच्या करकरडूमा न्यायालयाने 15 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. शाहरुखवर एका हवालदारावर पिस्तूल रोखल्याचा गंभीर आरोप आहे. दंगलीदरम्यान शाहरुखचा एक व्हिडीओही समोर आला होता. शाहरुखच्या वडिलांची खालावल्याने न्यायालयाने हा दिलासा दिला आहे.
अंतरिम जामीन मंजूर करताना न्यायालयाने शाहरुखची 20 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेच्या जामीनावर सुटका केली. शाहरुखच्या कुटुंबीयांनी दिलेली प्रमाणपत्रे आणि वडिलांची स्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. शाहरुखचा हा जामीन 15 दिवसांच्या कालावधीसाठी असून, त्यानंतर त्याला तात्काळ आत्मसमर्पण करावे लागेल.
2023 मध्ये मिळाला जामीन
यापूर्वी ऑक्टोबर 2023 मध्ये न्यायालयाने शाहरुखची रोहित शुक्ला नावाच्या व्यक्तीवर गोळ्या झाडल्याच्या आरोपात जामीन मंजूर केला होता आणि त्याच्यावरील आरोप खोटे असल्याचे मान्य केले होते. मात्र, इतर प्रकरणांमध्ये तो 3 एप्रिल 2020 पासून तुरुंगात आहे.