शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

Delhi Pollution : प्रदूषणाविरोधात दिल्लीकरांचा पुढाकार, शुद्ध हवेसाठी उभारला स्मॉग टॉवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 10:29 AM

दिल्लीला प्रदूषणाने विळखा घातला आहे. प्रदूषण आणि धोकादायक हवेला तोंड देण्यासाठी आता दिल्लीकरांनीच पुढाकार घेतला.

ठळक मुद्देप्रदूषण आणि धोकादायक हवेला तोंड देण्यासाठी आता दिल्लीकरांनीच पुढाकार घेतला.लाजपतनगर ट्रेजर्स असोसिएशन आणि खासदार गौतम गंभीर यांच्या पुढाकाराने दिल्लीमध्ये पहिला स्मॉग टॉवर साकारण्यात आला.अडीच लाख ते सहा लाख घनमीटर हवा एका दिवसाला शुद्ध करण्याची या टॉवरची क्षमता आहे.

नवी दिल्ली - दिल्लीलाप्रदूषणाने विळखा घातला आहे. प्रदूषण आणि धोकादायक हवेला तोंड देण्यासाठी आता दिल्लीकरांनीच पुढाकार घेतला आहे. लाजपतनगर ट्रेजर्स असोसिएशन आणि खासदार गौतम गंभीर यांच्या पुढाकाराने दिल्लीमध्ये पहिला स्मॉग टॉवर साकारण्यात आला आहे. त्यामुळे आता परिसरातील नागरिकांना शुद्ध हवा मिळू शकणार आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा अतिशय धोकादायक असल्याचे जाहीर केले जाते. प्रदूषणामुळे दिल्लीकरांमध्ये अतिशय चिंतेचे आणि नाराजीचे वातावरण आहे. मात्र प्रदूषणावर केवळ चर्चा करत राहण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आता दिल्लीकरच पुढे सरसावले आहेत. दक्षिण दिल्लीतील लाजपतनगर येथे स्मॉग टॉवर साकारण्यात आला आहे. धुके आणि धूर यांच्यापासून बनलेली हवा अतिशय धोकादायक बनते. मानवी आरोग्यावर ही हवा विपरित परिणाम करते. हा टॉवर ही हवा शुद्ध करणार आहे.

अडीच लाख ते सहा लाख घनमीटर हवा एका दिवसाला शुद्ध करण्याची या टॉवरची क्षमता आहे. राजधानी दिल्लीतील अशा प्रकारचा हा पहिलाच टॉवर आहे. 20 फूट उंच असलेला स्मॉग टॉवर दिवसाला 15 हजार नागरिकांना शुद्ध हवा पुरवू शकत असल्याने पुढाकार घेतल्याची माहिती असोसिएशनचे महासचिव अश्वनी मारवाह यांनी सांगितले आहे. या टॉवरसाठी एकूण सात लाख रुपयांचा खर्च आला आहे. तसेच टॉवरच्या देखभालीचा खर्च 30 हजार रुपये एवढा आहे. हा टॉवर विजेवर चालणारा असून सिलिंडरच्या आकाराचा आहे. 

बाहेरची हवा आत खेचून ती शुद्ध करणे आणि शुद्ध केलेली हवा बाहेर टाकण्याची यंत्रणा या स्मॉग टॉवरमध्ये बसवण्यात आली आहे. 500 ते 700 मीटर व्यास क्षेत्रातील हवा हा टॉवर शुद्ध करणार असल्याची माहिती मिळत आहे. स्मॉग टॉवरच्या उपयुक्ततेबाबत काही तज्ञांनी साशंकता व्यक्त केली आहे. प्रदूषणाने त्रस्त असलेल्या दिल्लीकरांना आता गारठ्याने हैराण केले आहे. थंडीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान बदलामुळे विमान व रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. धुके पसरल्याने विमान उड्डाणाला फटका बसला आहे. तर दुसरीकडे रेल्वे गाड्यांनाही फटका बसल्याने अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे छात्र परिषदेला जाणार नाहीत

संविधानाच्या प्रस्तावनेतून ''धर्मनिरपेक्ष'' शब्द हटवण्यात यावा, आरएसएसच्या नेत्याची मागणी   

सोनिया गांधींचा हिरवा कंदील, काँग्रेस मंत्र्यांना 'या' 10 खात्यांची लॉटरी 

अमेरिकेकडून पुन्हा इराकवर हवाई हल्ला, 6 जणांचा मृत्यू 

मोदी सरकार जिल्हा सरकारी रुग्णालयं देणार खासगी संस्थांच्या हाती?

 

टॅग्स :delhi pollutionदिल्ली प्रदूषणdelhiदिल्लीpollutionप्रदूषणGautam Gambhirगौतम गंभीर