Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 12:22 IST2025-12-28T12:21:23+5:302025-12-28T12:22:26+5:30
Video - दिल्लीत रस्त्यावरील हुल्लडबाजी आणि स्टंटबाजीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
दिल्लीत रस्त्यावरील हुल्लडबाजी आणि स्टंटबाजीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चार गाड्या दिसत असून, त्यातील तरुण भररस्त्यात कार रेसिंग आणि जीवघेणे स्टंट करताना दिसत आहेत. ही घटना काही दिवसांपूर्वीची असल्याचं सांगण्यात येत असून आयटीओकडून नोएडाकडे जाणाऱ्या मार्गावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, अतिशय वेगाने जाणाऱ्या कार एकमेकांच्या पुढे जाण्याच्या शर्यतीत धावत आहेत. काही गाड्या अचानक लेन बदलतात, तर काही चालक अतिशय धोकादायक पद्धतीने स्टंट करत इतर वाहनांना ओव्हरटेक करत आहेत. या प्रकारामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहन चालकांच्या आणि पादचाऱ्यांच्या जीवालाही मोठा धोका निर्माण झाला होता. ट्रॅफिक नियमांची उघडपणे ऐशीतैशी केल्याचे या क्लिपमध्ये दिसून येतं.
दिल्ली-लखनऊ हाईवे पर कार सवारों का हुड़दंग का वीडियो देखिये कैसे आधा दर्जन गाड़ियों ने हाईवे पर स्टंट किया जा रहा है। गाड़ियों से हूटर बजाकर हाईवे पर स्टंटबाजी और कारों के सनरूफ से निकलकर युवक गाड़ियां दौड़ा रहे हैं। बैखोफ हुड़दंगबाजों को पुलिस का बिल्कुल खौफ नहीं है। @Uppolicepic.twitter.com/cW8MDpjlTT
— SANTOSH KUMAR (@skumaar51) December 17, 2025
सोशल मीडियावर संताप
धक्कादायक घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक युजर्सनी या तरुणांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली असून, दिल्लीसारख्या शहरात रस्ते सुरक्षेबाबत इतका हलगर्जीपणा कसा होतो, असा सवालही उपस्थित केला आहे. नवीन वर्षाच्या काळात अशा घटना वाढतात, मात्र प्रशासन वेळेत कठोर पावलं उचलत नसल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं आहे.
तपास सुरू
दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून व्हायरल व्हिडिओची चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या गाड्यांचे क्रमांक आणि त्यातील तरुणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ओळख पटल्यानंतर संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.