यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात कैद झाली दिल्ली स्फोटाची ‘लाइव्ह’ घटना, पाहा धक्कादायक व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 15:24 IST2025-11-11T15:21:36+5:302025-11-11T15:24:18+5:30
Delhi Red Fort Bom Blast: यूट्यूबर लाल किल्ल्याजवळ इंटरव्ह्यू घेत होता, तेवढ्यात झाला स्फोट!

यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात कैद झाली दिल्ली स्फोटाची ‘लाइव्ह’ घटना, पाहा धक्कादायक व्हिडिओ...
Delhi Red Fort Bomb Blast: राजधानी दिल्ली पुन्हा एकदा भीषण बॉम्ब स्फोटाने हादरली. सोमवारी(दि.10) सायंकाळी लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाला, ज्यात 9-10 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने केवळ दिल्लीच नाही, तर संपूर्ण देश हादरला आहे. सध्या X, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर #OperationSindoor2.O हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.
यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात स्फोटाची घटना कैद
दरम्यान, या ही घटना एका यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात कैद झाली हे. एक यूट्यूबर लाल किल्ल्याजवळील रस्त्यावर लोकांची मुलाखत घेत होता, तेवढ्यात स्फोट झाला. या व्हिडिओत स्फोटाच्या आवाजाने दचकलेले लोक इकडे-तिकडे धावताना दिसत आहेत. काही तासांतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहून, त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या.
Trigger warning : Disturbing content ⚠️
— Govind Pratap Singh | GPS (@govindprataps12) November 10, 2025
लाल क़िले पर हुए धमाके की आवाज और उसका झटका एक यूट्यूब चैनल के वीडियो में देखा जा सकता है।
इस वीडियो में एक व्यक्ति बातचीत कर रहा था- तभी धमाके की आवाज सुनाई दी।
pic.twitter.com/hRgjnVZ5ul
सोशल मीडियावर संताप
व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर लोकांचा संताप उसळला. काहींनी सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली, तर अनेकांनी पीडितांप्रती संवेदना व्यक्त केल्या. देशाच्या राजधानीत असा हल्ला म्हणजे सुरक्षेचे गंभीर अपयश, असे अनेक युजर्स म्हणाले. तर काहींनी #OperationSindoor2.O या हॅशटॅगखाली लिहिले की, ही फक्त दुर्घटना नाही, तर देशाच्या सुरक्षेसाठी जागृतीचा इशारा आहे.