दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 15:40 IST2025-11-11T15:40:32+5:302025-11-11T15:40:54+5:30
Delhi red fort Bomb blast: काल रात्रीपर्यंत तपास यंत्रणांना या मृतदेहाची माहिती नव्हती. स्फोटाच्या ठिकाणाजवळच एका झाडावर लटकलेला एक मृतदेह तपास यंत्रणांना आज सकाळी आढळून आला आहे.

दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाने केवळ दहशत पसरवली नाही, तर या घटनेची भीषणता किती मोठी होती, याचा धक्कादायक पुरावा समोर आला आहे. काल, सोमवारी सायंकाळी झालेल्या स्फोटात मरण पावलेल्यांची संख्या आता १० वर पोहोचली आहे. स्फोटाच्या ठिकाणाजवळच एका झाडावर लटकलेला एक मृतदेह तपास यंत्रणांना आज सकाळी आढळून आला आहे.
ज्या ठिकाणी ह्युंदाई i20 कारमध्ये जोरदार स्फोट झाला, त्या स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, या व्यक्तीचा मृतदेह हवेत उडून जवळच्या एका झाडाच्या फांदीवर अडकला आणि लटकलेल्या अवस्थेत होता. काल रात्रीपर्यंत तपास यंत्रणांना या मृतदेहाची माहिती नव्हती. आज सकाळी जेव्हा तपास यंत्रणांचे पुरावे गोळा करताना त्या झाडाकडे लक्ष गेले. तेव्हा त्यांना धक्का बसला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, मृतांच्या शरीराचे अनेक भाग घटनास्थळी विखुरलेले आढळले.
५-१० किलो स्फोटकांचा अंदाज
प्राथमिक अंदाजानुसार, हा स्फोट ५ ते १० किलो स्फोटकांच्या बरोबरीचा होता, ज्यामुळे त्याचा परिणाम दूरवर झाला. तपास यंत्रणांसाठी हा एक अत्यंत धक्का देणारा व हृदयद्रावक प्रसंग होता. मृतदेह खाली उतरवून आता त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या नव्या मृतदेहामुळे स्फोटामुळे झालेले नुकसान आणि त्याची भीषणता किती मोठी होती, हे स्पष्ट झाले आहे.