शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! "मम्मी, लँडिंगनंतर फोन करतो", घरी आला मृत्यू झाल्याचा ईमेल; ३ महिन्यांचं बाळ पोरकं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 16:57 IST

मुलाच्या घरी परतण्याची आई-वडील वाट पाहत होते, त्याच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना एका 'ईमेल'ने दिली.

विमान अपघाताच्या आणखी एका दुःखद बातमीने 'एव्हिएशन सेफ्टी'वर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या अपघातात जीव गमावलेल्या पायलट स्वराजदीप यांच्या घरी सध्या शोककळा पसरली आहे. ज्या मुलाच्या घरी परतण्याची आई-वडील वाट पाहत होते, त्याच्या मृत्यूची माहिती कुटुंबीयांना एका 'ईमेल'ने दिली.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

विमानाने उड्डाण करण्यापूर्वी काही काळ आधी स्वराजदीप यांनी आपल्या कुटुंबाला फोन केला होता. त्यांनी सांगितलं होतं की, ते रांचीहून दिल्लीला जात आहेत आणि लँडिंग झाल्यानंतर पुन्हा फोनवर बोलतील. मम्मी, लँडिंगनंतर फोन करतो असं म्हटलं होतं. जेव्हा दोन तासांनंतर कुटुंबाने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचा फोन बंद लागला. त्यानंतर काही वेळातच न्यूज चॅनेलवर विमान कोसळल्याच्या बातम्या दिसू लागल्या.

अखेर संबंधित कंपनीने एक ईमेल पाठवून स्वराजदीप यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी केली. पायलट स्वराजदीप यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि ३ महिन्यांचं बाळ आहे. त्यांचं लग्न २० महिन्यांपूर्वीच झालं होतं. शेजारी आणि स्थानिक नागरिकांचे डोळे पाणावले आहेत. स्वराजदीप यांना ओळखणारे सर्वजण त्यांची आठवण एक अत्यंत दयाळू आणि सुसंस्कृत व्यक्ती म्हणून काढत आहेत.

शिक्षणासाठी, उपचारांसाठी, एअर ॲम्ब्युलन्ससाठीही कर्ज; विमान अपघाताने अनेक कुटुंबं उद्ध्वस्त

अमरदीप सिंह आणि मुख्तियार सिंह यांनी सांगितलं की, "आपल्या तरुण मुलाला अशा प्रकारे गमावणं हे कोणत्याही कुटुंबासाठी असह्य आहे. तो आपल्या आई-वडिलांचा अभिमान होता." या घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. लोक पीडित कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी पोहोचत आहेत, मात्र मुलाच्या जाण्याने आई-वडिलांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.

या घटनेनंतर स्थानिक लोकांमध्ये तीव्र संतापही पाहायला मिळत आहे. त्यांनी सरकार आणि नागरी उड्डाण मंत्रालयाकडे (DGCA) कठोर आवाहन केलं आहे की, विमान सुरक्षेबाबत कडक मानके निश्चित केली जावीत. वारंवार होणाऱ्या विमान अपघातांची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, जेणेकरून भविष्यात कोणाचाही 'स्वराजदीप' हिरावला जाणार नाही. तांत्रिक त्रुटींकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे.

टॅग्स :airplaneविमानDeathमृत्यू