रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 08:57 IST2024-10-13T08:46:48+5:302024-10-13T08:57:18+5:30
कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराच्या अचानक छातीत दुखू लागलं आणि तो खाली कोसळला.

रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
दिल्लीमध्ये रामलीलाचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान, रावणाचा भाऊ कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराच्या अचानक छातीत दुखू लागलं आणि तो खाली कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या वर्षीच्या शारदीय नवरात्रीत रामलीलामध्ये भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका करणाऱ्या कलाकाराने अचानक छातीत दुखू लागल्याचं सांगितलं. त्यांना लगेचच उपचारासाठी आकाश हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथून पीएसआरआय हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. शनिवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विक्रम तनेजा असं मृत्यू झालेल्या कलाकाराचं नाव असून ते पश्चिम विहार येथील रहिवासी होते.
दक्षिणी दिल्ली में सामाजिक रामलीला ग्रेटर कैलाश की ओर से चिराग दिल्ली में आयोजित रामलीला में कुंभकरण का किरदार निभा रहे कलाकार की हार्ट अटैक (Heart Attack) से मौत हो गई।https://t.co/5YkWibcpoipic.twitter.com/d5F3cfCKTc
— Dee (@DeeEternalOpt) October 12, 2024
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. ६० वर्षीय विक्रम तनेजा यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं म्हटलं जात आहे. अधिकाऱ्याने सांगितलं की, विक्रम यांच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवला गेला आहे.
याआधी शाहदरा परिसरात नवरात्रीनिमित्त रामलीलाच्या मंचादरम्यान रामाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा मृत्यू झाला होता. छातीत दुखत असल्याची तक्रार त्यांनी केली, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुशील कौशिक असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते व्यवसायाने प्रॉपर्टी डीलर होते.