Delhi Politics: भाजपने मनीष सिसोदियांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, पण...; अरविंद केजरीवालांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 14:45 IST2022-08-25T14:45:41+5:302022-08-25T14:45:51+5:30
Delhi Politics: दिल्लीतील सरकार पाडण्यासाठी भाजपने 800 कोटी जमवले-आपचा गंभीर आरोप

Delhi Politics: भाजपने मनीष सिसोदियांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, पण...; अरविंद केजरीवालांचा गौप्यस्फोट
दिल्ली: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आम आदमी पक्षाच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व आमदार राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीवर पोहोचले. यानंतर माध्यमांशी बोलताना केजरीवालांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, भाजपने मनीष सिसोदिया यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
दिल्ली के अपने विधायक साथियों के साथ आज राष्ट्रपिता महात्मा गाँधी जी के समाधि स्थल राजघाट पर श्रद्धांजलि अर्पित कर प्रार्थना की।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 25, 2022
सत्यमेव जयते। pic.twitter.com/9bkNG9WmeK
सिसोदियांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळी म्हणाले की, भाजपने मनीष सिसोदिया यांच्याशी संपर्क केला होता, अरविंद केजरीवालांची साथ सोडून भाजपमध्ये आल्यावर मुख्यमंत्री करू, अशी ऑफर भाजपने दिल्याचा गौप्यस्फोट केजरीवाल यांनी केला. तसेच, भाजपमध्ये आल्यावर सिसोदियांविरोधातील सर्व केसेसे मागे घेतल्या जातील, अशीही ऑफर दिल्याचे केजरीवालांनी सांगितले.
सिसोदियांचा भाजपला नकार
केजरीवाल पुढे म्हणाले की, सिसोदिया यांनी तात्काळ भाजपची ऑफर धुडकाऊन लावली. मी मागच्या जन्मी पुन्याचे काम केले असेल, म्हणूनच मला सिसोदियांसारका साथी मिळाला. सिसोदिया यांनी नकार दिल्यानंतर आता ते आमच्या आमदारांना पैसे देऊन पक्षात येण्यास सांगत आहेत. त्यांनी आमच्या 40 आमदारांना 20-20 कोटींची ऑफर दिली, पण आमचा एकही आमदार फुटला नाही, असा दावाही केजरीवालांनी यावेळी केला.