१० मिनिटांत भाजीपाला देणाऱ्या 'ब्लिंकिट'वर दिल्ली पोलिसांचा छापा; एका मोठ्या गुन्ह्याशी आहे कनेक्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 13:37 IST2026-02-18T13:36:06+5:302026-02-18T13:37:51+5:30

किराणा सामान आणि भाजीपाला अवघ्या १० मिनिटांत घरपोच पोहोचवणाऱ्या 'ब्लिंकिट' या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

Delhi Police raids 'Blinkit', which delivers vegetables in 10 minutes; There is a connection to a major crime! | १० मिनिटांत भाजीपाला देणाऱ्या 'ब्लिंकिट'वर दिल्ली पोलिसांचा छापा; एका मोठ्या गुन्ह्याशी आहे कनेक्शन!

१० मिनिटांत भाजीपाला देणाऱ्या 'ब्लिंकिट'वर दिल्ली पोलिसांचा छापा; एका मोठ्या गुन्ह्याशी आहे कनेक्शन!

घरातील किराणा सामान आणि भाजीपाला अवघ्या १० मिनिटांत घरपोच पोहोचवणाऱ्या 'ब्लिंकिट' या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. दिल्लीच्या ख्याला परिसरात झालेल्या दोन हत्यांच्या तपासानंतर पोलिसांनी 'ब्लिंकिट'च्या स्टोअर्सवर छापेमारी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या हत्येमध्ये वापरलेले चाकू चक्क 'ब्लिंकिट'वरून मागवण्यात आले होते, असा खुलासा झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तब्बल ५० बेकायदेशीर चाकू जप्त केले आहेत.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

पोलिसांनी असं केलं स्टिंग ऑपरेशन

दिल्लीतील ख्याला भागात दोन वेगवेगळ्या खुनाच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणातील आरोपींची जेव्हा पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा त्यांनी सांगितले की, गुन्ह्यासाठी वापरलेले घातक चाकू त्यांनी 'ब्लिंकिट'वरून ऑर्डर केले होते. हा खुलासा ऐकून पोलीसही चक्रावून गेले. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी स्वतः ग्राहक बनून या ॲपवरून चाकूची ऑर्डर दिली. १० मिनिटांत जेव्हा डिलिव्हरी आली, तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. तो चाकू नियमानुसार बेकायदेशीर ठरणाऱ्या बटनवाल्या चाकूंच्या श्रेणीत होता.

५० घातक चाकू जप्त, ब्लिंकिटला नोटीस

पुरावा हाती लागताच दिल्ली पोलिसांनी ब्लिंकिटच्या विविध स्टोअर्सवर छापेमारी केली आणि सुमारे ५० बेकायदेशीर बटन चाकू जप्त केले. कायद्यानुसार, ठराविक लांबीपेक्षा जास्त असलेले आणि बटन दाबून उघडणारे चाकू विकणे किंवा बाळगणे हा गुन्हा आहे. ब्लिंकिटवर अशा प्रतिबंधित वस्तूंची विक्री होत असल्याने पोलिसांनी कंपनीला चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.

इतर ऑनलाइन ॲप्सही रडारवर!

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ ब्लिंकिटच नाही तर इतर अनेक ऑनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरही आता संशयाची सुई आहे. हे चाकू कोणत्या सप्लायरमार्फत प्लॅटफॉर्मवर पोहोचले आणि या विक्रीवर कोणाचे नियंत्रण होते, याचा तपास सध्या सुरू आहे. ऑनलाईन कंपन्या आपल्या नफ्यासाठी लोकांच्या सुरक्षेशी खेळत आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या कारवाईमुळे ऑनलाइन ग्रोसरी प्लॅटफॉर्मच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, येत्या काळात दिल्ली पोलीस इतर कंपन्यांनाही दणका देण्याच्या तयारीत आहेत.

Web Title : दिल्ली पुलिस ने हत्या में इस्तेमाल अवैध चाकू के लिए ब्लिंकिट पर छापा मारा

Web Summary : दिल्ली पुलिस ने ब्लिंकिट पर छापा मारा क्योंकि दो हत्याओं में इस्तेमाल चाकू प्लेटफॉर्म से जुड़े थे। 50 अवैध चाकू जब्त किए गए, और ब्लिंकिट को नोटिस मिला। प्रतिबंधित वस्तुओं को बेचने के लिए अन्य ऑनलाइन प्लेटफॉर्म भी जांच के दायरे में हैं।

Web Title : Delhi Police Raid Blinkit Over Illegal Knives Used in Murders

Web Summary : Delhi Police raided Blinkit after knives used in two murders were traced back to the platform. 50 illegal knives were seized, and Blinkit received a notice. Other online platforms are also under investigation for selling prohibited items.