शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

"दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 9:21 PM

Farmer Protest : . दिल्लीचा पाणीपुरवठा थांबवू, दिल्लीचे रस्ते बंद करू, दिल्लीला घेराव घालून बसू. असं म्हणणं योग्य नाही. ही लाहोर-कराची नाही, ही देशाची राजधानी आहे

चंदिगड - दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे राजधानी दिल्लीत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, हरयाणा सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी आपले आंदोलन थांबवून मध्यममार्ग काढावा. त्यामुळे दिल्लीच्या नागरिकांना त्रास होणार नाही. शेतकऱ्यांनी सदसदविवेकबुद्धीने विचार करावा, असे आवाहन हरयाणाचे कृषिमंत्री जे.पी. दलाल यांनी केले आहे.जे. पी. दलाल यांनी सांगितले की, मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की, त्यांनी सदबुद्धीने विचार करावा. चर्चा करावी. दिल्लीचा पाणीपुरवठा थांबवू, दिल्लीचे रस्ते बंद करू, दिल्लीला घेराव घालून बसू. असं म्हणणं योग्य नाही. ही लाहोर-कराची नाही, ही देशाची राजधानी आहे.दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीही शेतकऱ्यांना आवाहान केले होते. ते म्हणाले होते की, हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. तसेच दीर्घकाळानंतर त्यामध्ये सुधारणा केल्या जात आहेत. मात्र जर त्यांना त्यामध्ये काही अडचणी जाणवत असतील तर आम्ही त्यांच्या चिंतांबाबत चर्चा करण्यास तयार आहोत. आम्ही उद्या शेतकऱ्यांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहोत. तसेच कुठपर्यंत तोडगा निघेल याची चाचपणी करणार आहोत.दरम्यान, दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आता ट्रक ऑपरेटर्सचाही पाठिंबा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून ८ डिसेंबरपासून संप पुकारण्याची घोषणा केली आहे.सरकारसोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी शेतकऱ्यांकडून मात्र आंदोलन सुरू आहे. चिल्ला बॉर्डरवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आपल्याशी चर्चा करावी, असा आग्रह धरला आहे. दरम्यान, शेतकरी आणि केंद्र सरकारमधील काल झालेली बैठक अनिर्णित राहिली आहे.एआयएमटीसी गुड्स व्हेईकल ऑपरेटर्सचे प्रतिनिधित्व करते. याअंतर्गत सुमारे दहा मिलियन म्हणजेच १ कोटी ट्रकर्स येतात. देशात सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यामध्ये यांचे मोठे योगदान असते. आता आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ८ डिसेंबरपासून संप पुकारण्याच येणार असल्याचा इशारा एआयएमटीसीने दिला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीdelhiदिल्लीHaryanaहरयाणा