शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हाजीर हो...; दिल्ली हायकोर्टाचं समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 13:33 IST

या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या १७ एप्रिलला दिल्ली हायकोर्टात पार पडणार आहे.

नवी दिल्ली - शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात कोर्टाने तिघांना समन्स बजावले आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने तिघांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 

काय आहे प्रकरण? खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं होतं की, ज्या आमदार, खासदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला त्यांच्याविरोधात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यावर मानहानीचा दावा करण्यात आला आहे. ही याचिका दिल्ली हायकोर्टाने दाखल करून घेत तिन्ही नेत्यांना प्रत्यक्ष कोर्टात आवश्यक ती कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबत समन्स जारी केला आहे. 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेच्या ४० आमदार, १३ खासदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. त्यानंतर सातत्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या आमदार-खासदारांवर आक्रमक टीका करत आहेत. अनेक ठिकाणी खोके उल्लेख करून डिवचण्यात येते. आजही सोशल मीडियावर शिंदे गटातील आमदार,खासदारांवर केलेली विधाने आहेत. त्यामुळे दिल्ली हायकोर्टाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मविरोधातही नोटीस काढली आहे. या पोस्ट का हटवण्यात आल्या नाहीत असा खुलासा कोर्टाने मागितला आहे. 

या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या १७ एप्रिलला दिल्ली हायकोर्टात पार पडणार आहे. दिल्ली हायकोर्टाच्या आजच्या सुनावणीत मानहानीच्या दाव्याची याचिका दाखल करण्यात आली. राहुल शेवाळे यांच्याकडून बाजू मांडणाऱ्या वकिलांनी कोर्टात ठाकरेंकडून केलेले बदनामीकारक विधाने सादर केली. या विधानाचे गांभीर्य ओळखून कोर्टाने ही याचिका स्वीकारली. न्यायालयाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात मनाई आदेश काढू नयेत यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तुमचे जे काही म्हणणे असेल ते लेखी दाखल करा असं कोर्टाने आदेशात म्हटलं आहे. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतAaditya Thackerayआदित्य ठाकरेRahul Shewaleराहुल शेवाळे