Oxygen Shortage: रुग्णालयांचा पुरवठा कमी करा, घरी उपचार घेणाऱ्यांना ऑक्सिजन द्या: दिल्ली हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 07:42 PM2021-04-29T19:42:17+5:302021-04-29T19:44:10+5:30

Oxygen Shortage: सर्वोच्च न्यायालयासह देशातील विविध उच्च न्यायालयात अनेकविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

delhi high court says reducing oxygen quota from hospital and provide to home isolation patients | Oxygen Shortage: रुग्णालयांचा पुरवठा कमी करा, घरी उपचार घेणाऱ्यांना ऑक्सिजन द्या: दिल्ली हायकोर्ट

Oxygen Shortage: रुग्णालयांचा पुरवठा कमी करा, घरी उपचार घेणाऱ्यांना ऑक्सिजन द्या: दिल्ली हायकोर्ट

Next
ठळक मुद्देदिल्ली उच्च न्यायालयाचे ताशेरेऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात महत्त्वाचे निर्देशदिल्ली सरकाने मांडली बाजू

नवी दिल्ली: देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयासह देशातील विविध उच्च न्यायालयात अनेकविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन, रेमडेसिवीर, खाटा इत्यादींचा तुटवडा व अन्य प्रश्नांवर न्यायालयांमध्ये सुनावणी सुरू आहे. एका याचिकेवर सुनावणी करताना रुग्णालयांचा पुरवठा कमी करा, घरी उपचार घेणाऱ्यांना ऑक्सिजन द्या, असे निर्देश दिल्लीउच्च न्यायालयाने दिले आहेत. (delhi high court says reducing oxygen quota from hospital and provide to home isolation patients)

दिल्ली उच्च न्यायालयातील एका याचिकेवरील सुनावणीवेळी रुग्णालयात असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनपासून वंचित ठेवण्यात जात आहे, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर घरीच उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांना येणाऱ्या समस्यांकडेही लक्ष देत असल्याचे दिल्ली सरकारकडून सांगण्यात आले. 

राज्यात १५ दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज; मुंबई हायकोर्टाची सरकारला सूचना

हा कठीण काळ आहे

घरी राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांचा विचार करता रुग्णालयांचा ऑक्सिजन काही काळासाठी कमी करावा लागेल, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले. त्यावर दिल्ली सरकारने स्पष्ट केले की, हा कठीण काळ आहे. कोणा एकाला ऑक्सिजन हवा असेल तर दुसऱ्याला तो मिळणार नाही.  अशा परिस्थितीत आपण ऑक्सिजनसाठीचे दोन वेगवेगळे रिफिलर्स लावू शकतो. ज्यापैकी एक रुग्णालयांसाठी असेल, तर दुसरा घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी असेल, असेही न्यायालयाला सांगण्यात आले. 

लगेचच भारत सोडा! अमेरिकेच्या नागरिकांना सूचना, नव्या गाइडलाइन्स जारी

दरम्यान, दिल्लीला ४९० मेट्रिक टन मिळाला आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी आम्ही वितरण केंद्रे स्थापन करण्याचाही विचार करत आहोत. अनेक खासगी रुग्णालयांनाही ऑक्सिजनची गरज आहे. अशातच रुग्णालयांसाठी दिलेला ऑक्सिजन तिकडे वळवण्यात येईल, असेही सरकारच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगण्यात आले.
 

Web Title: delhi high court says reducing oxygen quota from hospital and provide to home isolation patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.