शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

Google Pay परवानगीशिवाय कसं काय चालतंय?; न्यायालयानं RBIकडे मागितलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 3:19 PM

भारतातलं लोकप्रिय डिजिटल पेमेंट अ‍ॅप गुगल पेसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयानं आरबीआयला खडे बोल सुनावले आहेत.

नवी दिल्लीः भारतातलं लोकप्रिय डिजिटल पेमेंट अ‍ॅप गुगल पेसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयानं आरबीआयला खडे बोल सुनावले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं आरबीआय आणि गुगल इंडियाकडून उत्तर मागितलं आहे. कोणत्याही मंजुरीशिवाय गुगल पे अ‍ॅप कसं काय चालतंय. गुगल पे अ‍ॅप कोणत्याही मंजुरीशिवाय भारतात चालत असल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि न्यायमूर्ती ए. जे. भंभानी यांच्या खंडपीठासमोरच्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना आरबीआयला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले आहेत. गुगल पे पेमेंट नियमांचं उल्लंघन करत आहे. भारतात अवैधरीत्या त्याचा वापर केला जातो. गुगल पे पेमेंट अ‍ॅपला आरबीआयकडून कोणतंही वैध प्रमाणपत्र मिळालेलं नाही, असंही याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं यासंदर्भात गुगल इंडिया आणि आरबीआयला एक नोटीसही पाठवली आहे.अभिजित मिश्रा यांच्याकडून उत्तर मागवण्यात आलं आहे. 20 मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत 'पेमेंट सिस्टम ऑपरेटर'च्या यादीत गुगल पेचं नाव नाही. या यादीत हे नाव नसल्याचं समोर आल्यानंतर ही खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :googleगुगल