याला म्हणतात 'हटके लग्न'! पुढे-मागे पोलीस अन् मधे 'नवरदेव-नवरी', अशी करण्यात आली पाठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 05:37 PM2020-04-27T17:37:58+5:302020-04-27T17:53:35+5:30

नवी दिल्ली : आपले लग्न जरा हटके व्हावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. मात्र, लॉकडाउनमुळे अशांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेकांनी लग्न ...

Delhi Groom Reaches Wedding Venue In Police Gypsy Amid Lockdown sna | याला म्हणतात 'हटके लग्न'! पुढे-मागे पोलीस अन् मधे 'नवरदेव-नवरी', अशी करण्यात आली पाठवणी

याला म्हणतात 'हटके लग्न'! पुढे-मागे पोलीस अन् मधे 'नवरदेव-नवरी', अशी करण्यात आली पाठवणी

googlenewsNext
ठळक मुद्देया लग्नाला केवळ दोनच पाहुणे उपस्थित होते आणि ते म्हणजे दोन पोलीसमुलीची पाठवणीही पोलिसांनी त्यांच्याच जिप्सीतून केली.पोलिसांच्या परवानगीनंतर पार पडला विवाह


नवी दिल्ली : आपले लग्न जरा हटके व्हावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. मात्र, लॉकडाउनमुळे अशांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेकांनी लग्न समारंभ पुढे ढकलले आहेत. तर अनेक जण लॉकडाउनमध्येच लग्न करत आहेत. मात्र, या काळातही जे लग्न करत आहेत. त्यांच्यासाठी हे लग्न जरा हटकेच म्हणावे लागेल. दिल्लीमध्येही एक असेच लग्न पार पडले. या लग्नाला पुढे आणि मागे पोलीस, तर मधे नवरदेव-नवरी होते. अर्थात या लग्नाला केवळ दोनच पाहुणे उपस्थित होते आणि ते म्हणजे दोन पोलीस. विशेष म्हणजे मुलीची पाठवणीही पोलिसांनी त्यांच्याच जिप्सीतून केली.

दिल्ली येथील गोविंदपुरीतील 27 वर्षीय कुशल वालिया याने शनिवारी पूजा नावाच्या मुलीशी लग्नगाठ बांधली. या लग्नाला घरच्यांच्या शिवाय केवळ दोन पोलीसच होते. या जोडप्याला तेच येथील कालकाजी येथील आर्य समाजाच्या मंदिरात घेऊन गेले. विशेष म्हणजे यांना पोलीस ठाण्यातूनच नेण्यात आले.

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! महागाई भत्ता गोठवल्यानंतर, आता 'या' भत्त्याला लागू शकते कात्री

स्वतःच केला मेकअप अन् आईचीच नेसली साडी -
लग्नामध्ये आपण सुंदर दिसावे, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. मात्र, लॉकडाउनमुळे सर्वच दुकाने बंद आहेत. त्यामुळे पूजाने स्वत:च आपल्या मेकअप करून घेतला आणि आईची साडी नेसून लग्न केले. यावेळी कुशल आणि पूजासह तेथील मंडळींनीही मास्कचा वापर केला होता. लग्नानंतर पोलिसांनीच आपल्या जिप्सीतून कुशल आणि पूजाला घरी सोडले. 

यासंदर्भात बोलताना कुशल म्हणाला, 'माझ्या वडिलांनी लग्नापूर्वी पोलिसांची परवानगी घेतली. तसेच लग्नात आई वडिलां शिवाय इतर कुणीही उपस्थित राहणार नाही,' असे सांगितले. यानंतर हा विवाह पार पडला. 

किम जोंगनंतर बहीण नव्हे, 'हे' बनू शकतात उत्तर कोरियाचे हुकूमशहा; संपूर्ण जग म्हणतं 'जल्लाद'!

Web Title: Delhi Groom Reaches Wedding Venue In Police Gypsy Amid Lockdown sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.