शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
3
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
4
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
5
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
6
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
7
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
8
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
9
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
10
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
11
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
12
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
13
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
14
महाड, रोह्यामध्ये महायुतीचे कार्यकर्ते भिडले, रायगड जिल्ह्यात मतदानादरम्यान तुंबळ हाणामारी
15
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
16
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
17
विशेष लेख: मोदी म्हणतात, ‘काँग्रेस फुटेल!’-खरेच तसे होईल?
18
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
19
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
20
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
Daily Top 2Weekly Top 5

कन्हैया कुमारविरोधात देशद्रोहाचा खटला चालणार, केजरीवालांनी दिली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 20:11 IST

पोलिसांनी 2016च्या या प्रकरणात कुमारसह जेएनयूचा माजी विद्यार्थी असलेला उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे.

ठळक मुद्देजवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील छात्र संघाचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि अन्य दोघांविरोधात खटला चालवण्यासाठी दिल्ली पोलिसांना मंजुरी दिली आहे. पोलिसांनी 2016च्या या प्रकरणात कुमारसह जेएनयूचा माजी विद्यार्थी असलेला उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. आरोपींनी नऊ फेब्रुवारी 2016 जेएनयू परिसरात एका कार्यक्रमादरम्यान रॅली काढली होती आणि त्या रॅलीमध्ये देशविरोधी घोषणा देत समर्थन केलं होतं.

नवी दिल्लीः दिल्ली सरकारनं देशद्रोहाच्या प्रकरणात जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातील छात्र संघाचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि अन्य दोघांविरोधात खटला चालवण्यासाठी दिल्ली पोलिसांना मंजुरी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी 2016च्या या प्रकरणात कुमारसह जेएनयूचा माजी विद्यार्थी असलेला उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. आरोपींनी नऊ फेब्रुवारी 2016 जेएनयू परिसरात एका कार्यक्रमादरम्यान रॅली काढली होती आणि त्या रॅलीमध्ये देशविरोधी घोषणा देत समर्थन केलं होतं. जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेता कन्हैया कुमार याने सध्या केंद्रातील सरकार आणि नरेंद्र मोदींविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. दरम्यान, कन्हैया कुमारच्या नेतृत्वात काल पाटणा येथे ‘संविधाान बचाओ नागरिकता बचाओ’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र ही सभा अनेक गोष्टीमुळे वादग्रस्त ठरली. या सभेच्या शेवटी भाषण देण्यास उठलेल्या कन्हैया कुमारने उत्साहाच्या भारात राष्ट्रगीताने आपल्या भाषणाची सुरुवात केली. मात्र स्वत: कन्हैया कुमारच राष्ट्रगीतातील शेवटच्या ओळी विसरला. ही बाब चर्चेचा विषय ठरली.दरम्यान, कन्हैया कुमारच्या नेतृत्वात काल पाटणा येथे आयोजित करण्यात आलेली ‘संविधाान बचाओ नागरिकता बचाओ’ सभा या व्यतिरिक्तही इतर अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरली. कन्हैयाचे भाषण सुरू होण्यापूर्वी सहा-सात वर्षांच्या मुलाने देशातील सध्याच्या परिस्थितीबाबत चार ओळी ऐकवल्या. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात ‘नरेंद्र मोदी मुर्दाबाद’ अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर कन्हैया कुमारने या मुलाला आपल्या जवळ बोलावून त्याला आलिंगण दिले. 

टॅग्स :kanhaiya kumarकन्हैय्या कुमारArvind Kejriwalअरविंद केजरीवाल