Delhi Elections 2025: भाजपची चौथी यादी जाहीर, 9 उमेदवारांच्या नावाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 15:42 IST2025-01-16T15:40:10+5:302025-01-16T15:42:32+5:30

BJP Candidate list Delhi Elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. 

Delhi Elections 2025: BJP's fourth list released, names of 9 candidates announced | Delhi Elections 2025: भाजपची चौथी यादी जाहीर, 9 उमेदवारांच्या नावाची घोषणा

Delhi Elections 2025: भाजपची चौथी यादी जाहीर, 9 उमेदवारांच्या नावाची घोषणा

Delhi Elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९ उमेदवारांची चौथी यादी गुरुवारी (१६ जानेवारी) जाहीर केली. चौथ्या यादीत दोन महिलांना उमेदवाराचा समावेश आहे. वजीरपूर विधानसभा मतदारसंघातून पूनम शर्मा यांना, तर ग्रेटर कैलास मतदारसंघातून शिखा राय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. (BJP releases the fourth list of 9 candidates for Delhi Assembly election 2025)

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी निवडणूक होत असून, भाजपने आतापर्यंत ६८ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. उर्वरित दोन जागा भाजप मित्र पक्षांना देण्याची शक्यता आहे.

भाजपच्या चौथ्या यादीत कोणाची नावे?

बवाना विधानसभा मतदारसंघ - रवींद्र कुमार

वजीरपूर विधानसभा मतदारसंघ - पूनम शर्मा

दिल्ली कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघ - भुवन तंवर

संगम विहार विधानसभा मतदारसंघ - चंदन कुमार चौधरी 

ग्रेटर कैलाश विधानसभा मतदारसंघ - शिखा राय

त्रिलोकपुरी विधानसभा मतदारसंघ - रविकांत उज्जैन

शाहदरा विधानसभा मतदारसंघ - संजय गोयल

बाबरपूर विधानसभा मतदारसंघ - अनिल वशिष्ठ 

गोकलपूर विधानसभा मतदारसंघ - प्रवीण निमेष

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने तरुण आणि नवीन चेहऱ्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. तर काही माजी खासदारांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी एका टप्प्यात मतदान होणार आहे. तर ८ फेब्रुवारी निकाल जाहीर होणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आप, भाजप आणि काँग्रेस त्रिशंकू लढाई होताना दिसत आहे. इंडिया आघाडीतील बहुमतांश पक्षांनी दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. 

Web Title: Delhi Elections 2025: BJP's fourth list released, names of 9 candidates announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.