शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

Delhi Election Results: केजरीवालपुत्राचा भाजपाला चिमटा; मुलीला तर कॉन्फिडन्सच होता!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 3:06 PM

दिल्ली विधानसभेत आपला 60 पेक्षा कमी जागा येईल याचा आम्ही विचार केलाच नव्हता.  मी स्वत: बुथ लेव्हलवर काम केले. प्रचाराच्या काळात लोकांचा उत्साह पाहिला. त्यामुळे आपचा दणदणीत विजय होईल, असा विश्वास होता, असंही हर्षिताने सांगितले. 

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत शानदार विजय मिळविल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे. केजरीवाल हे सलग तिसऱ्यांदा राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. त्यातच केजरीवाल यांच्या पत्नीचा वाढदिवसही निकालाच्या दिवशीच होता. त्यामुळे केजरीवाल कुटुंबीयांच्या आनंदात भर पडली होती. 'आप'च्या विजयानंतर केजरीवाल यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया दिल्या.  

या निवडणुकीत केजरीवाल यांचे चिरंजीव पुलकीत केजरीवाल यांनी पहिल्यांदाच मतदान केले होते. यावर पुलकीतला विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला की, पहिल्यांदाच मतदान केले आणि तेही आपल्या पित्याला केले. दिल्लीतील जनतेने प्रचंड बहुमताने 'आप'ला विजयी केले. त्यामुळे माझं मत कामी आल्याचा आनंद असल्याचे पुलकीतने सांगितले. 

केजरीवाल यांची मुलगी हर्षिता म्हणाली की, विरोधकांना जनतेने मतपेटीतून उत्तर दिले आहे. विरोधकांनी शिव्या-शाप देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामुळे त्यांना मतं मिळाली नाही. काम केल्यावर मतं मिळतात. त्यासाठी रुग्णालय, शाळा आणि मोहल्ला क्लिनीक सुरू करावे लागते, असा टोला हर्षिताने विरोधकांना लगावला. 

दरम्यान दिल्ली विधानसभेत आपला 60 पेक्षा कमी जागा येईल याचा आम्ही विचार केलाच नव्हता.  मी स्वत: बुथ लेव्हलवर काम केले. प्रचाराच्या काळात लोकांचा उत्साह पाहिला. त्यामुळे आपचा दणदणीत विजय होईल, असा विश्वास होता, असंही हर्षिताने सांगितले.