शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election Results : दिल्लीतील 61 टक्के नवनिर्वाचित आमदारांवर दाखल आहेत गंभीर गुन्हे, बलात्कार विनयभंगाचेही आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 20:20 IST

इतर पक्षांपेक्षा वेगळे राजकारण करण्याचे वचन देत राजकारणात उतलेली आप आणि पार्टी विथ डिफरन्सची घोषणा करणाऱ्या भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांबाबत एक धक्कादायक महिती समोर आली आहे.

नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने दणदणीत विजय मिळवला. आपला एकूण 70 जागांपैकी 62 जागांवर विजय मिळाला. तर भाजपाला केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले आहे.  दरम्यान, इतर पक्षांपेक्षा वेगळे राजकारण करण्याचे वचन देत राजकारणात उतलेली आप आणि पार्टी विथ डिफरन्सची घोषणा करणाऱ्या भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांबाबत एक धक्कादायक महिती समोर आली आहे. दिल्लीतील एकूण 61 टक्के म्हणजेच 43 नविर्वाचित आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) च्या अहवालामधून ही माहिती समोर आली आहे. त्यानुसार दिल्लीतील 70 पैकी 43 आमदारांवर कुठला ना कुठला गुन्हा दाखल आहे. त्यापैकी 13 आमदारांवर महिलांच्या शोषणासंबंधीचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील आपच्या एका आमदारावर बलात्काराचा आरोप आहे. तर एकावर हत्येचा प्रयत्न आणि दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

 नवनिर्वाचित आमदारांपैकी 37 आमदारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.  दिल्ली विधानसभेच्या मावळत्या सभागृहातील 24 आमदारांवर गुन्हे नोंद होते. मात्र यावेळी हा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आपच्या 62 नवनिर्वाचित आमदारांपैकी 33 जणांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तर भाजपाच्या आठ पैकी चार जणांविरोधात गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. 

संबंधित महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Election Results : ...म्हणून केजरीवालांच्या शपथविधीला इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही

Delhi Election Results : भाजपा नेत्यांची वादग्रस्त विधाने भोवली, अमित शाह यांनी चूक कबूल केली 

गंभीर नसता तर भाजपाची अवस्था झाली असती आणखी गंभीर; जाणून घ्या कशी?

दरम्यान, आपचे रिठाला येथील आमदार मोहिंदर गोयल यांनी आपल्यावर कलम 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा नोंद असल्याचे निवडणुकीच्या शपथपत्रात नोंद केले आङे. त्याशिवाय आपच्या अमानतुल्ला खान, दिनेश मोहिनिशा, प्रकाश, जरनेल सिंह  आणि सोमनाथ भारती यांच्याविरोधात कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा आरोप आहे. तर भाजपाचे नवनिर्वाचित आमदार अभय वर्मा आणि अनिल वाजपेयी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.  

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपBJPभाजपाPoliticsराजकारण