Delhi Election Result: अमित शाहांचे पोस्टर झळकावून AAP कार्यकर्ते म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 14:26 IST2020-02-11T14:26:11+5:302020-02-11T14:26:52+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी पुन्हा एकदा मोठा विजय मिळवण्याच्या मार्गावर आहे.

Delhi Election Result: अमित शाहांचे पोस्टर झळकावून AAP कार्यकर्ते म्हणाले...
नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी पुन्हा एकदा मोठा विजय मिळवण्याच्या मार्गावर आहे. आम आदमी पार्टीच्या कार्यालयात आपचे कार्यकर्ते जल्लोष करत असून, कार्यकर्ते ढोलताशांच्या गजरात नाचत आहेत. या जल्लोषातच आम आदमी पार्टीच्या कार्यालयाबाहेर एक पोस्टर झळकावण्यात आला आहे. ज्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिसत आहेत. करंट लागला का?, अशी विचारणा अमित शाहांना या पोस्टरमधून करण्यात आली आहे.
आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते नाचतगाजत हे पोस्टर झळकावत आहेत. दिल्लीतल्या शाहीन बागचा मुद्दा हा निवडणुकीत भाजपाच्या केंद्रस्थानी होता. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आम आदमी पार्टीवर हल्लाबोल केला होता. एका सभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले होते, दिल्लीकरांनो ईव्हीएमचं बटण एवढ्या जोरानं दाबा की मत इकडे मिळेल आणि करंट शाहीन बागमध्ये लागेल. तीच री पकडून आपच्या कार्यकर्त्यांनी अमित शाहांना करंट लागला का?, असं विचारत डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात प्रदर्शन करणाऱ्या शाहीन बागच्या आंदोलकांवर भाजपा सातत्यानं हल्ले चढवत आहे. अमित शाह यांच्यासह कपिल मिश्रा, परवेश वर्मासह प्रत्येक नेते शाहीन बागच्या आंदोलनाला आपची फूस असल्याची टीका करत आहेत. अमित शाह यांनीसुद्धा अनेक सभांमध्ये शाहीन बागचं आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचं सांगितलं होतं.Delhi: Aam Aadmi Party workers celebrate as the party takes big lead in #DelhiPolls2020 trends pic.twitter.com/BZTAAKDOuC
— ANI (@ANI) February 11, 2020