शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

'दिल्लीत अरविंद केजरीवाल जिंकणार, काँग्रेस...', पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 22:16 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत पृथ्वीराच चव्हाण यांनी मोठा दावा केला आहे.

Delhi Election 2025 : दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दिल्लीत 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहेत. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे वक्तव्य केले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा विजय होईल, असे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या निवडणुकीचा प्रचार अधिक तीव्र केला आहे. आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेसमध्ये प्रमुख लढत आहे. मागील निवडणुकीत 70 पैकी आपला 62 आणि भाजपला 8 जागा मिळाल्या होत्या. तर, काँग्रेसला मागील दोन्ही निवडणुकीत भोपळा मिळाला आहे. आता सर्वच पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. अशातच, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 

आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "दिल्लीची निवडणूक खूप महत्त्वाची आहे. मला वाटते अरविंद केजरीवाल जिंकतील. काँग्रेसही रिंगणात आहे. आप आणि काँग्रेस, यांच्यात युती व्हायला हवी होती, पण तसे झाले नाही. इथे (महाराष्ट्र) बसून दिल्लीत काय चालले आहे हे सांगणे कठीण होईल," अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

मागील दोन निवडणुकीत आपचा मोठा विजय अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी (आप) दिल्लीत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, तर भाजपही सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. काँग्रेसही यंदा आपली प्रतिष्ठा टिकवण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, आम आदमी पक्षाने 2015 आणि 2020 च्या निवडणुकीत अनुक्रमे 67 आणि 62 जागांसह मोठा विजय मिळवला होता. तर, भाजपला 2015 मध्ये 3 आणि 2020 मध्ये 8 जागांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसला दोन्ही निवडणुकांमध्ये खातेही उघडता आले नव्हते. 

काँग्रेसने 2024 ची लोकसभा निवडणूक दिल्लीत आम आदमी पार्टीसोबत आघाडी करून लढवली होती. मात्र, आता आम आदमी पार्टीने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पक्षाने आपले सर्व 70 जागांसाठी उमेदवारही जाहीर केले असून, पक्षाचा प्रचार सुरू झाला आहे. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणAAPआपBJPभाजपाcongressकाँग्रेस