सोशल मीडियावर जोरदार जुंपली, दिल्ली विधानसभा निवडणुकीची लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 04:30 AM2020-01-30T04:30:58+5:302020-01-30T04:35:01+5:30

भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस सोशल मीडियावर एकामेकांविरुद्ध जोरदार प्रचार करीत आहेत.

delhi election 2020 : Social media war, contesting Delhi Assembly elections | सोशल मीडियावर जोरदार जुंपली, दिल्ली विधानसभा निवडणुकीची लढत

सोशल मीडियावर जोरदार जुंपली, दिल्ली विधानसभा निवडणुकीची लढत

Next

- नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : जसजशी दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत आहे, तसतशा सोशल मीडियासह इंटरनेटवर निवडणूक प्रचाराचा जोर वाढत आहे. भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस सोशल मीडियावर एकामेकांविरुद्ध जोरदार प्रचार करीत आहेत.
भाजपच्या सोशल मीडिया समितीच्या एका सदस्याने ओळख उघड न करण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले की, दिल्लीतील प्रत्येक मतदान केंद्रावर पाच आणि विभाग स्तरावर तीन लोकांचे पथक आहे. याशिवाय राज्यपातळीवर ८ आणि लोकसभा मतदारसंघात एक-एक सदस्यांकडे सोशल मीडियाची जबाबदारी देण्यात आली आहे. हे सर्व सोशल मीडियासाठीचा मजूकर तयार करणे आणि तो प्रसारित करण्याचे काम करतात. मोदी सरकारने दिल्लीसाठी केलेल्या कामाला विशेष महत्त्व दिले जात आहे, तसेच केजरीवाल सरकारच्या अपूर्ण आश्वासनांवर भर दिला जात आहे. सर्जनशील पथक व्हिडिओ, ग्राफिक्स आणि इतर टिंगल-टवाळी करणाऱ्या चित्रकृती तयार करतात.
दररोज लाखो रुपयांचा खर्च
डिजिटल जाहिरांतीवर राजकीय पक्ष दररोेज लाखो रुपये खर्च करीत आहेत. यात आम आदमी पार्टी सर्वांत आघाडीवर आहे. फेसबुकवर गेल्या सात दिवसांत आम आदमी पार्टीने १३ लाखा रुपयांच्या जाहिराती दिल्या. यापैकी सात लाख रुपये मागच्या सोमवारी खर्च करण्यात आले. भाजपने फेसबुकवर १ लाख ७६ हजार रुपयांच्या जाहिराती दिल्या. यापैकी ३१ हजार रुपये एका दिवसांत खर्च करण्यात आले.

सोशल मीडियात ‘डर्टी पिक्चर’
राजकीय पक्षांच्या जाहिरातीशिवाय नेत्यांकडूनही व्यक्तिश: किंवा अप्रत्यक्षपणे जाहिरातींवर खर्च केला जातो. अनेकदा पक्षाच्या प्रचारासाठी एखादा समर्थक किंवा कार्यकर्त्यामार्फत खर्च केला जातो. असे सर्वच पक्ष करतात. एखाद्या विचारधारेचे अनेक लोक समर्थक आहेत, असेही भासविले जाते. तथापि, हा केवळ भ्रम असतो; परंतु लोक प्रभावित होतात.

Web Title: delhi election 2020 : Social media war, contesting Delhi Assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.