Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 08:03 AM2020-02-08T08:03:24+5:302020-02-08T08:21:18+5:30

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Delhi Election 2020 Polling for 70 Assembly constituencies in Delhi begins | Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Delhi Election 2020 : दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Next
ठळक मुद्देदिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रिंगणात उतरलेल्या 672 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

नवी दिल्ली -  दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रिंगणात उतरलेल्या 672 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. निवडणुकीसाठी दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. जामिया मिलिया, जेएनयू व शाहीनबाग येथील सीएएविरोधी आंदोलन हे निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे बनले होते.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, तसेच गोपाल राय व आतिशी (सर्व आप), भाजपाचे आशीष सूद, तेजिंदरपाल बग्गा, विजेंदर गुप्ता आणि अरविंदरसिंह लवली, कृष्णा तीरथ, अलका लांबा हे महत्त्वाचे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस भाजपा आणि काँग्रेसचा ‘रोड शो’, तर आम आदमी पार्टीच्या ‘झाडू चलाओ यात्रा’ने गाजला. शेवटच्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, बॉलीवूड स्टार खासदार सनी देओल, तर काँग्रेससाठी अभिनेता तसेच खासदार राज बब्बर यांनी ‘रोड शो’ व पदयात्रा केल्या.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक करण्याची कुठलीही संधी सोडली नाही. आरोप-प्रत्यारोपांच्या या मालिकेत मतदारांना आकर्षित करण्यासाठीही सर्वच पक्षांनी आतोनात प्रयत्न केले. गुरुवारचा दिवस सर्व पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा साऱ्यांनीच प्रयत्न केला. 70 मतदारसंघांमध्ये 2688 मतदान केंद्रांची व्यवस्था आयोगाने केली आहे. यातील 516 मतदान केंद्रांना अतिसंवेदनशील श्रेणीत ठेवण्यात आले आहे. 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

दिल्लीतील तयारीचा राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी आढावा घेतला. सायंकाळपासूनच मतदान केंद्रावर अधिकारी दाखल झाले होते. केंद्राचा परिसर सुरक्षा रक्षकांनी वेढला होता. काही ठिकाणी वाहतूकही वळविण्यात आली. ही निवडणूक आम आदमी पक्षासाठी अटीतटीची, भारतीय जनता पक्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नेतृत्व कसोटी पाहणारी, तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे. निवडणूक प्रचारात स्थानिक ते राष्ट्रीय मुद्दे प्रचारात गाजले. अनेक आयाराम-गयारामही यंदा रिंगणात उतरले आहेत.




 

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ, 2nd ODI Live Score: भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

Delhi Election : दिल्लीच्या ७० विधानसभा जागांसाठी आज मतदान; पोलीस बंदोबस्तात वाढ

शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ १५ एप्रिलपूर्वी द्या; उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मोर्चाच्या तयारीसाठी मनसेचा आक्रमक प्रचार; सोशल मीडिया ते चौकसभांतून लोकांना आवाहन

 

Read in English

Web Title: Delhi Election 2020 Polling for 70 Assembly constituencies in Delhi begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.