शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
5
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
6
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
7
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
8
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
9
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
10
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
11
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
12
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
13
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

Opinion Poll : दिल्लीत केजरीवालांचाच बोलबाला, आप उडवणार भाजपची दाणादाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 11:25 AM

दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आप, विरोधी पक्षातील भाजपा आणि काँग्रेस असे तीन पक्ष मैदानात आहेत. मात्र मुख्य लढत ही आप आणि भाजपामध्येच आहे.

ठळक मुद्देअरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष 54 ते 60 जागा जिंकेलभाजपाला 10 ते 14 जागा मिळतील आपला एकूण 52 टक्के मते मिळतील. तर भाजपाला 34 टक्के मते मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे सध्या दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. दिल्लीत सत्ताधारी आप, विरोधी पक्षातील भाजपा आणि काँग्रेस असे तीन पक्ष मैदानात आहेत. मात्र मुख्य लढत ही आप आणि भाजपामध्येच आहे. दरम्यान, आता मतदानाला काही दिवस उरले असताना दिल्लीतील मतदारांचा कल जाणून घेतला असता दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांचाच बोलबाला असल्याचे दिसून आले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपला 54 ते 60 तर भाजपाला 10 ते 14 जागा मिळतील असा अंदाज टाइम्स नाऊने प्रसारित केलेल्या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीला आठवडा उरला असतान टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीने मतदारांचा कल जाणून घेतला आहे. त्यानुसार आजच्या घडीला मतदान झाल्याच दिल्लीत आपच बाजी मारणार हे स्पष्ट झाले आहे.  दिल्लीतील 70 मतदारसंघातील एकूण सात हजार 321 मतदारांशी संवाद साधून त्यांचा कल जाणून घेण्यात आला आहे. त्यानुसार दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपला एकूण 52 टक्के मते मिळतील. तर भाजपाला 34 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला मात्र मोठा फटका बसणार असून, काँग्रेसला दहा टक्क्यांच्या आत मते मिळण्याची शक्यता आहे. या मतांचे जागांमध्ये परिवर्तन केल्यास आपला 54 ते 60 तर भाजपाला 10 ते 14 जागा मिळतील. तर काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागेल. 

पण आजच्या घडीला लोकसभेची निवडणूक झाल्यास मात्र दिल्लीतील लोकसभेच्या सात पैकी सातही मतदारसंघात भाजपाचा विजय होईल, असेही हा सर्व्हे सांगतो. आज लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपाला 46 तर आपला 38 टक्के मते मिळतील. तसेच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम आहे. पंतप्रधानपदासाठी सुमारे 75 टक्के लोकांनी मोदींना पसंती दिली आहे. तर 8 टक्के लोकांनी राहुल गांधी यांच्या नावास प्राधान्य दिले आहे.

Delhi Election 2020 : अर्ध्याहून अधिक उमेदवार फक्त बारावी पास, 16 अशिक्षित

शाहीनबागचे आंदोलन राज्यघटना न मानणाऱ्यांचे; मोदींचा प्रचारसभेत हल्लाबोल

Delhi Elections: स्वामींची भविष्यवाणी; भाजपा 41 जागा जिंकेल!

Delhi Election 2020 : 'आप'च्या 36 उमेदवारांवर गुन्हे दाखलदरम्यान, सध्या गाजत असलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि शाहीनबाग येथील आंदोलनाबाबतही दिल्लीकरांचे मत या सर्व्हेमधून जाणून घेण्यात आले आहे. त्यामध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत विचारणा केली असता तब्बल 71 टक्के लोकांनी या कायद्याला पाठिंबा दिला आहे. तसेच शाहीनबाग येथील आंदोलनाला 52 टक्के लोकांनी विरोध केला आहे. तर 25 टक्के लोकांनी शाहीनबाग येथील आंदोलन योग्य असल्याचे म्हटले आहे.  

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाcongressकाँग्रेस