मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झटका; न्यायालयाने न्यायालयीन कोठडी वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 02:40 PM2024-04-15T14:40:13+5:302024-04-15T15:05:10+5:30

केंद्रीय तपास एजन्सी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अटक केली होती. आता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी २३ एप्रिलपर्यंत वाढवली आहे.

delhi cm arvind kejriwal judicial custody till april 23 says delhi court | मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झटका; न्यायालयाने न्यायालयीन कोठडी वाढवली

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झटका; न्यायालयाने न्यायालयीन कोठडी वाढवली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने कोर्टाने झटका दिला आहे. न्यायालयानेदिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत २३ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर आज त्यांना तिहार तुरुंगातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. जिथे न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीने २१ मार्च रोजी दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी त्यांच्या निवासस्थानातून अटक केली होती. यानंतर कोर्टाने त्यांना दोनदा ईडी रिमांडवर पाठवले. यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी १ एप्रिल रोजी न्यायालयीन कोठडीत केली. तेव्हापासून केजरीवाल तिहार तुरुंगात आहेत.

काँग्रेस लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतं; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं

आज पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी आरोप केले,  केजरीवाल यांना गुन्हेगाराप्रमाणे तुरुंगात ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, “त्यांना पाहून मी भावूक झालो. त्यांना गुन्हेगारासारखे वागवले जात आहे. त्यांची चूक काय? त्यांनी मोहल्ला दवाखाने बनवले हा त्यांचा दोष आहे का?, असा सवालही त्यांनी केला.

सुप्रीम कोर्टात सुनावणी

आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर ईडीकडून २४ एप्रिलपर्यंत उत्तर मागितले आहे. २९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी होईल, असे न्यायालयाने सांगितले.

सीएम केजरीवाल यांनी ईडीच्या अटकेला आव्हान दिले आहे. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांना दिलासा देण्यास नकार दिला होता.

Web Title: delhi cm arvind kejriwal judicial custody till april 23 says delhi court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.