Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 11:38 IST2025-11-12T11:37:44+5:302025-11-12T11:38:57+5:30
Delhi Blast And Amar Kataria : अमर कटारिया हा लाल किल्ल्याजवळील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या १० जणांपैकी एक होता. त्याच्या हातावर असलेल्या टॅटूवरून त्याच्या मृतदेहाची ओळख पटली. :

फोटो - आजतक
चांदणी चौकातील व्यापारी अमर कटारिया हा लाल किल्ल्याजवळील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या १० जणांपैकी एक होता. त्याच्या हातावर असलेल्या टॅटूवरून त्याच्या मृतदेहाची ओळख पटली. ३४ वर्षीय अमर फार्मास्युटिकचा व्यवसाय करत होता. त्याला फिरण्याची आणि बाइकिंगची खूप आवड होती. चार वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आणि त्याला तीन वर्षांचा एक मुलगा आहे.
इंडिया टुडेशी बोलताना, अमरचे वडील जगदीश कटारिया म्हणाले की, "मंगळवारी सकाळीच आम्हाला रुग्णालयातून फोन आला, सांगितलं की, एका मृतदेहाच्या हातावर टॅटू आहेत - ‘Mom my first love’, ‘Dad my strength’ आणि ‘Kriti’ . त्यांनी हे कोणाचं नाव आहे असं विचारलं? तेव्हा माझे डोळे पाणावले आणि मी हा माझा मुलगा आहे असं उत्तर दिलं."
Delhi: Amar Kataria’s business partner says, "As far as we know, he had just stepped out of the shop when the blast occurred. He was supposed to catch the metro near Lal Qila to go home, but he never even reached the metro. The incident happened right there on the street..." pic.twitter.com/4nQLoD1KU0
— IANS (@ians_india) November 11, 2025
देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
अमरच्या मृत्यूची बातमी ऐकताच कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला. सोमवारी रात्री अमर त्याचे वडील, आई, पत्नी कृती आणि मुलासोबत जेवायला बाहेर जाणार होता. त्याने त्याच्या वडिलांना फोन करून थोडं पुढे येण्यास सांगितलं होतं, जेणेकरून ते सर्वच एकत्र जाऊ शकतील. पण आधीच स्फोट झाला आणि त्याने जीव गमावला.
"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहिणींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
अमरच्या पालकांनी संपूर्ण रात्र वेगवेगळ्या रुग्णालयात फिरून काढली. व्हीआयपी तपासणी आणि सुरक्षेमुळे आत जाणे कठीण झालं. अखेर, त्यांना पहाटे ४ वाजल्यानंतर अमरचा मृतदेह सापडला. अमरच्या मानेवर खोल जखम असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. अमर खूपच चांगला माणूस असल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितलं. त्याच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.