Delhi Cabinet Minister: मुख्यमंत्री रेखा गुप्तांचे मंत्रिमंडळ कसे आहे, कोणाचा समावेश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:20 IST2025-02-20T13:19:20+5:302025-02-20T13:20:22+5:30

Delhi Ministers: नवी दिल्लीमध्ये अखेर सरकार स्थापन झाले. रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली, तर सहा आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. 

Delhi Cabinet Minister: How is Chief Minister Rekha Gupta's cabinet, who is included? | Delhi Cabinet Minister: मुख्यमंत्री रेखा गुप्तांचे मंत्रिमंडळ कसे आहे, कोणाचा समावेश?

Delhi Cabinet Minister: मुख्यमंत्री रेखा गुप्तांचे मंत्रिमंडळ कसे आहे, कोणाचा समावेश?

CM Rekha Gupta cabinet: विधानसभा निवडणुकीत दणदणीत बहुमत मिळवल्यानंतर भाजपने गुरुवारी (२० फेब्रुवारी) सरकार स्थापन केले. दिल्लीला नवा मुख्यमंत्री मिळाला. रामलिला मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रि‍पदाची, तर सहा आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही राज्यातील मुख्यमंत्रीही उपस्थित होते. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी रेखा गुप्ता यांची निवड करत भाजपने पुन्हा एकदा सर्वांना धक्का दिला. पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा गुप्तांना थेट मुख्यमंत्री बनवण्यात आले, तर मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्यांना मंत्रि‍पदावर समाधान मानावं लागलं. 

मंत्रि‍पदाची शपथ घेणार सहा आमदार कोण?

प्रवेश वर्मा

दोन वेळा आमदार आणि २ वेळा खासदार राहिलेले वर्मा यावेळी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत होते. जाट समुदायातून येणार वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे सुपुत्र आहेत. २०१३ मध्ये ते महरौली विधानसभा मतदारसंघातून आमदार बनले होते. 

२०१४ आणि २०१९ मध्ये ते पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत गेले. २०२४ मध्ये त्यांचे तिकीट कापण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत प्रवेश वर्मा यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला. त्यांची आता दिल्लीच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. 

आशिष सूद

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राहिलेल्या आशिष सूद यांनी दिल्ली भाजपचे उप प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले आहे. ते महासचिव आणि सचिवही होते. दक्षिण दिल्ली पालिकेत ते नगरसेवक होते. गोवा भाजपचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांना आता भाजपने मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. 

मंजिंदर सिंह सिरसा

शीख समुदायातून येणारे आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव राहिलेले सिरसा रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकारमध्ये काम करणार आहेत. ते तीन वेळा आमदार राहिले आहेत. दिल्लीतील शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षही होते. 

२०२१ मध्ये ते अकाली दल पक्षातून भाजपमध्ये आले होते. २०२३ पासून भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून काम करत आहेत. पंतप्रधान मोदींचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांची चर्चा होते. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. 

रवींद्र सिंह

दलित समुदायातून येणाऱ्या सिंह यांनी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. ते पहिल्यांदाच बवाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकले आहेत. १६ टक्के दलित मतांवर भाजपची नजर असून, त्यामुळे त्यांनी दिली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

कपिल मिश्रा

दुसऱ्यांदा आमदार बनल्यानंतर भाजपने कपिल मिश्रा यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. मिश्रा यापूर्वीही कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत. पूर्वी ते आपमध्ये होते. २०१३ मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला.  २०१५ मध्ये निवडणुकीत ते विजयी झाले आणि आमदार बनले. 

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते. २०१७ मध्ये त्यांची हकालपट्टी करण्यात आली. २०१९ मध्ये त्यांनी आपचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०२३ पासून ते दिल्ली भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. 

पंकज कुमार सिंह

राजपूत समुदायातून येणाऱ्या सिंह हे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या मंत्रिमंडळात दिसणार आहेत. दोन वेळा नगरसेवक राहिलेले सिंह हे मूळचे बिहारचे आहेत. 

Web Title: Delhi Cabinet Minister: How is Chief Minister Rekha Gupta's cabinet, who is included?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.