शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

डोळे बंद करुन, हात बांधून लटकल्यानं होईल मोक्षप्राप्ती; 11 मृतदेह आढळलेल्या 'त्या' घरात सापडली चिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2018 8:28 AM

दिल्लीच्या घरात पोलिसांनी सापडली महत्त्वपूर्ण कागदपत्रं

दिल्ली: राजधानी दिल्लीतील एकाच घरात रविवारी 11 मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली. एकाच कुटुंबातील इतक्या व्यक्तींचे मृतदेह एकाचवेळी आढळल्यानं परिसरात मोठी घबराट पसरली. या हत्या आहेत की आत्महत्या, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. सध्या दिल्ली पोलिसांचा गुन्हे विभाग या घटनेचा तपास करत आहे. या घटनेमागे अंधश्रद्धा असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र खरंच यामागे अंधश्रद्धा आहे आहे की तसा देखावा करुन पोलिसांची दिशाभूल केली जात आहे, याचाही तपास सध्या सुरू आहे. दिल्लीतील बुरारीमधील ज्या घरात 11 जणांचे मृतदेह आढळले, त्या घरात सापडलेल्या कागदपत्रांमधील माहिती अतिशय धक्कादायक आहे. पोलिसांना तपासादरम्यान घरात दोन रजिस्टर आढळून आले आहेत. यामध्ये जो मजकूर आहे, अगदी त्याचप्रकारे घरातील एका खोलीत 10 मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. तर अकरावा मृतदेह दुसऱ्या खोलीत सापडला. 'तुम्ही जर टेबलाचा वापर करुन डोळे बंद केलेत आणि हात बांधलेत, तर तुम्हाला मोक्षप्राप्ती होईल,' असा मजकूर रजिस्टरमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे अंधश्रद्धेतून या कुटुंबानं स्वत:चा अंत केला असावा, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही रजिस्टरमधील काही पानांमधील माहिती धक्कादायक आहे. कोणत्या व्यक्तीनं कुठे लटकायला हवं, याचा तपशील रजिस्टरमध्ये आहे. कुटुंबातील कोणत्या व्यक्तीनं कुठे लटकूवन जीव द्यावा, याची नोंद रजिस्टरमध्ये आहे. घरात आढळलेले मृतदेह अगदी रजिस्टरमध्ये केलेल्या नोंदीनुसार लटकलेल्या अवस्थेत सापडल्यानं पोलिसही आश्चर्य व्यक्त करत आहेत.   

टॅग्स :delhiदिल्लीDeathमृत्यूMurderखूनPoliceपोलिस