"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 15:11 IST2025-09-15T15:10:28+5:302025-09-15T15:11:25+5:30

Navjot Singh : भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातील डेप्युटी सेक्रेटरी नवजोत सिंग यांचा मृत्यू झाला. तर पत्नी संदीप कौर गंभीर जखमी झाल्या आहेत.

delhi bmw accident fir revelations navjot singh | "माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो

फोटो - आजतक

दिल्लीच्या धौला कुआन येथे झालेल्या भीषण बीएमडब्ल्यू अपघाताबाबत दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. या अपघातात भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातील डेप्युटी सेक्रेटरी नवजोत सिंग यांचा मृत्यू झाला. तर पत्नी संदीप कौर गंभीर जखमी झाल्या आहेत.

एफआयआरमध्ये नोंदवलेल्या जबाबामुळे या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. एफआयआरनुसार, अपघाताच्या वेळी नवजोत सिंग श्वास घेत होते आणि त्यांची पत्नी संदीप कौर यांनी आरोपी जोडप्याला वारंवार विनंती केली की, प्लीज जवळच्या रुग्णालयात घेऊन जाऊया.

"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप

संदीप कौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आरोपी महिलेला म्हटलं की, प्लीज, आम्हाला जवळच्या रुग्णालयात घेऊन चला, परंतु त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. बीएमडब्ल्यू चालक महिला आणि तिच्या पतीने जाणूनबुजून जवळच्या रुग्णालयाऐवजी १९ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका लहान रुग्णालयात नेलं असा आरोप संदीप कौर यांनी केला आहे.

"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते पण प्राथमिक उपचार मिळाले नाहीत" असं संदीप कौर यांनी सांगितलं. एका कार्गो व्हॅनमधून नेण्यात आलं ज्यामध्ये रक्तस्त्राव झालेल्या नवजोत यांना कोणत्याही प्राथमिक उपचाराशिवाय तसंच ठेवण्यात आलं. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी नवजोत सिंग यांना मृत घोषित केलं. 

हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?

महिला चालक बीएमडब्ल्यू कार वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत होती, असंही एफआयआरमध्ये नोंदवलं आहे.कार नवजोत सिंग यांच्या बाईकला धडकली. या धडकेनंतर बाईक प्रथम डिव्हायडरला आणि नंतर बसला धडकली, ज्यामुळे नवजोत आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले. संपूर्ण सत्य बाहेर येण्यासाठी अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब देखील गोळा केले जात आहेत.

Web Title: delhi bmw accident fir revelations navjot singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.