दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 19:01 IST2025-11-13T19:00:54+5:302025-11-13T19:01:29+5:30
अल-फलाह विद्यापीठ हे फरीदाबादच्या धौज गावात आहे. खरे तर, लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवून आणणारा डॉ. उमर नबी हा याच विद्यापीठात कार्यरत होता. यामुळे हे विद्यापीठ चर्चेत आले आहे. याशिवाय त्याचे दोन सहकारी, डॉ. मुजम्मिल शकील आणि डॉ. शाहीन शाहिद हे दोघेही याच विद्यापीठात कार्यरत होते.

दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
दिल्लीतील कार ब्लास्टनंतर, हरियाणातील फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठ वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या स्फोट प्रकरणातील संशयित डॉ. मुजम्मिल शकील आणि डॉ. शाहीन सईद हे दोघेही या विद्यापीठात कार्यरत होते. यामुळेच तपास यंत्रणांची दृष्टी आता या विद्यापीठावर आहे. या संस्थेचे संस्थापक जावेद अहमद सिद्दीकी असून, त्यांना पूर्वी साडेसात कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात तीन वर्षांची शिक्षाही सुनावली गेली आहे. अरबी भाषेत ‘अल-फलाह’चा अर्थ, यश किंवा समृद्धी असा होतो.
या स्फोट प्रकरणाशी संबंध जोडला गेल्यानंतर, या विद्यापीठावर अंमलबजावणी संचालनालयाचेही (ईडी) लक्ष आहे. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रनांनी विद्यापीठाच्या निधीची चौकशी सुरू केली आहे. संस्थापक जावेद अहमद यांचे विस्तृत कॉर्पोरेट नेटवर्क असून त्यांच्या नऊ कंपन्या अल-फलाह चॅरिटेबल ट्रस्टशी संबंधित आहेत. या कंपन्या शिक्षण, वित्तीय सेवा, सॉफ्टवेअर आणि ऊर्जा क्षेत्रात कार्यरत आहेत. तथापि, विद्यापीठाचे कायदेशीर सल्लागार मोहम्मद रजी यांनी सिद्दीकी यांच्यावरील फसवणुकीचे आरोप फेटाळले आहेत.
अल-फलाह विद्यापीठ हे फरीदाबादच्या धौज गावात आहे. खरे तर, लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवून आणणारा डॉ. उमर नबी हा याच विद्यापीठात कार्यरत होता. यामुळे हे विद्यापीठ चर्चेत आले आहे. याशिवाय त्याचे दोन सहकारी, डॉ. मुजम्मिल शकील आणि डॉ. शाहीन शाहिद हे दोघेही याच विद्यापीठात कार्यरत होते. हे विद्यापीठ आता प्रशासकीय आणि गुन्हेगारी तपास, अशा दोन्ही स्तरांवर तपासाच्या फेऱ्यात आले आहे.
विद्यापीठाला एनएएसीची नोटीस -
दरम्यान विद्यापीठ अनुदान आयोगांतर्गत (यूजीसी) येणाऱ्या एनएएसी या एका स्वायत्त संस्थेने अल-फलाहला आपल्या वेबसाईटवर, मान्यते संदर्भात चुकीची माहिती दिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. १२ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या या नोटीशीमध्ये, 'विद्यापीठाने आपल्या घटक महाविद्यालयांना एनएएसीने ‘A ग्रेड’ दिला असल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यांची मान्यता पूर्वीच संपुष्टात आली आहे.