Dr Shahin Shahid News: 'ती विचारांनी उदारमतवादी होती. ती धार्मिक नव्हती. ती पल्मोनोलॉजिस्ट (फुफ्फुसे आणि श्वसन प्रणालीच्या रोगांचा अभ्यास असलेली संबंधित डॉक्टर). आमचा २०१२ मध्ये घटस्फोट झाला आणि तेव्हापासून आम्ही तिच्या संपर्कात नाहीये.' हे विधान आहे असे जैश ए मोहम्मदची भारतातील महिला विंगची कमांडर शाहीन शाहीद हिच्या पहिल्या पतीचे. शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर यांच्याशी विवाह झाला होता. पण, २०१२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यावेळी त्यांचा घटस्फोट झाला, तेव्हा त्यांना दोन मुलं झालेली होती.
शाहीन शाहीदचा पूर्व पती हयात जफर हेही डॉक्टर आहेत. ते मूळचे महाराष्ट्रातील आहेत. शाहीन शाहीदला अटक झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच तिच्याबद्दल सांगितलं.
शाहीन शाहीदबद्दल डॉ. जफर यांनी काय सांगितले?
"माझे तिच्यासोबत कोणतेही संबंध नाहीत. आता आमच्यात काहीही नाही. आम्ही २०१२ मध्ये वेगळे झालो. आम्हाला दोन मुले आहेत आणि ते माझ्यासोबतच राहतात. आमचं अरेंज मॅरेज होतं. जेव्हापासून आमचा घटस्फोट झाला तेव्हापासून मी तिच्या संपर्कात नाहीये", असे डॉ. जाफर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
घटस्फोट का झाला?
"ती अशी धार्मिक वृत्तीची नव्हती. ती खुल्या विचारांची होती. तिची ऑस्ट्रेलिया किंवा युरोपमध्ये स्थायिक व्हायची इच्छा होती. ऑस्ट्रेलियामध्ये राहायला जाण्याच्या मुद्द्यावरून आमच्यामध्ये मतभेद होते. त्यावरूनच आम्ही घटस्फोट घेतला आणि वेगळे झालो. माझे मुलेही तिला बोलत नाहीत. ती पल्मोनोलॉजिस्ट विषयाची प्राध्यापक होती. तिने २००६ मध्ये पदवी घेतली होती", असे डॉ. जफर यांनी सांगितले.
शाहीन शाहीद अल फलाह विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक होती. तिचे काश्मीरमधील डॉ. मुझम्मिलसोबत जवळचे संबंध होते. मुझम्मिललाही पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासडे २९०० किलो स्फोटकांसाठीचे साहित्य सापडलं आहे. फरिदाबादमध्ये भाड्याने घेतलेल्या घरात पोलिसांना स्फोटकांचा हा साठा मिळाला.
Web Summary : Shaheen Shahid's ex-husband, Dr. Zafar, revealed their 2012 divorce stemmed from differing views on religion and relocation. He retains custody of their children and has no contact with her since.
Web Summary : शाहीन शाहिद के पूर्व पति, डॉ. जफर ने बताया कि 2012 में उनका तलाक धर्म और स्थानांतरण पर अलग-अलग विचारों के कारण हुआ। उनके बच्चों की कस्टडी उनके पास है और तब से उनका उससे कोई संपर्क नहीं है।