दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 10:23 IST2025-11-11T10:21:49+5:302025-11-11T10:23:47+5:30

फरीदाबाद मॉड्यूलचा दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद फरार होता. तपास यंत्रणा त्याला शोधत होती

Delhi Blast 2025: 10 revelations so far in Delhi blast; What is the connection with Faridabad module? | दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?

दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?

नवी दिल्ली - दिल्लीच्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी रात्री भयंकर स्फोट घडला. या स्फोटात आतापर्यंत १० हून अधिक लोक मारले गेलेत तर २० जण जखमी आहेत. एका कारमध्ये हा स्फोट झाला, तो इतका भीषण होता की पाहता पाहता अनेक कार आगीच्या विळख्यात सापडल्या. या स्फोटानंतर केंद्रीय तपास यंत्रणा घटनास्थळी पोहचल्या आणि त्यांना तपासाला सुरुवात केली. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळील हा स्फोट फरीदाबादच्या दहशतवादी मॉड्यूलसोबत जोडला जात आहे.

पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या कारमधील मृतदेहांचे DNA टेस्ट केले आहेत, जेणेकरून कारमधील ती व्यक्ती डॉक्टर उमर मोहम्मद आहे की नाही याची खातरजमा होईल. गुप्तचर यंत्रणांना संशय आहे की या I20 कारमध्ये डॉक्टर उमर मोहम्मदच होता. या व्यक्तीचा एक सीसीटीव्ही सापडला असून ज्यात तो काळ्या रंगाचा मास्क घातलेला दिसतो. फरीदाबाद येथे मोठ्या प्रमाणात अमोनियम नाइट्रेट सापडल्यानंतर दिल्ली पोलिसांसह इतर यंत्रणा डॉक्टर उमर मोहम्मदचा शोध घेत होती. फरीदाबाद मॉड्यूलचा दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद फरार होता. तपास यंत्रणा त्याला शोधत होती. सूत्रांनुसार तपासात खालील माहिती समोर आली आहे. 

  1. स्फोटावेळी दहशतवादी उमर मोहम्मद कारमध्ये एकटाच होता. त्याने २ साथीदारांसोबत मिळून हल्ल्याची योजना आखली होती. फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलमध्ये अनेक जणांना अटक झाल्यानंतर मोहम्मदला अटक होण्याची भीती होती. त्यामुळे त्याने साथीदारांसोबत मिळून कारमध्ये डेटोनेटर लावले आणि स्फोट घडवून आणला.
  2. I-20 कार बदरपूर बॉर्डरवर शेवटची दिसली होती, बदरपूरहून दिल्लीत प्रवेश करताना ही कार सीसीटीव्हीत कैद झाली. त्यानंतर ही कार दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनवर गेट नंबर १ कडे उभी होती. 
  3. लाल किल्ला येथील मस्जिद येथे पार्किंगमध्ये ३ तास कार उभी होती. दुपारी ३ वाजून १९ मिनिटांनी कार पार्किंगमध्ये आली आणि त्यानंतर संध्याकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी पार्किंगमधून बाहेर पडली. त्यानंतर ६ वाजून ५५ मिनिटांनी स्फोट झाला
  4. दिल्ली पोलिसांच्या हाती ते सीसीटीव्ही फुटेज लागले आहेत, ज्यात संशयित कार पार्किंगमध्ये जाते आणि त्यानंतर पुन्हा बाहेर येते. त्यात उमर एकटाच होता. आता तपास यंत्रणा त्या मार्गावर जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत आहे. पोलिसांनी आतापर्यंत १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज पाहिले आहेत. त्याशिवाय आसपासच्या टोल नाक्यावरही तपासणी सुरू आहे.
  5. ज्या I 20 कारने लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवला, त्याचा मालक मोहम्मद सलमान हा होता. त्याने नदीम नावाच्या व्यक्तीला कार विकली. नदीम एक कार डिलर होता, त्याच्याकडून तारिकने कार खरेदी केली. त्यानंतर ती उमरला विकली. हरियाणाच्या गुरुग्राम नॉर्थ आरटीओत त्याची नोंद आहे. 
  6. तारीकला रात्री पोलिसांनी पुलवामाच्या संबूरा येथून ताब्यात घेतले. परंतु कारच्या आरसीवर तारीकचं नाव नाही. २०१५ साली तारीकने ही कार उमरला दिली होती. तोपर्यंत तारीकचे नाव होते. पोलिसांनी यात दोघांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. त्यात आमिर नावाच्या व्यक्तीचे कनेक्शन पुढे आले. जम्मू काश्मीर पोलीस तारीक आणि आमिरची चौकशी करत आहेत. 
  7. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी सांगितले होते की, स्फोट झालेल्या कारमध्ये तीन लोक होते. हा आत्मघातकी हल्ला आहे का याचा तपास करत आहेत. मात्र आता उमर मोहम्मद कारमध्ये एकटाच होता असं पोलीस म्हणत आहेत.
  8. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, "हा स्फोट चालत्या हुंडई आय-२० कारमध्ये झाला, ज्यामध्ये तीन लोक होते. आम्हाला जखमींच्या शरीरात कोणत्याही चिऱ्याच्या खुणा आढळल्या नाहीत. जे स्फोटात असामान्य आहे. आम्ही सर्व पैलूंची चौकशी करत आहोत. दिल्ली पोलिसांनी संध्याकाळी उशिरा कार मालक मोहम्मद सलमानला ताब्यात घेतले आणि कारबद्दल त्याची चौकशी केली. सलमानने दीड वर्षांपूर्वी ओखला येथील देवेंद्र नावाच्या व्यक्तीला कार विकली होती. नंतर ही कार अंबाला येथील एकाला आणि नंतर पुलवामा येथील तारिक नावाच्या व्यक्तीला विकण्यात आली. पोलिस त्या लोकांचा शोध घेत आहेत.
  9. दिल्ली पोलिसांनी स्फोटात एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी दहशतवादी कृत्ये आणि त्यांच्यासाठी शिक्षेशी संबंधित यूएपीएच्या कलम १६ आणि १८ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. स्फोटक पदार्थ कायद्याच्या कलम ३ आणि ४ देखील जोडण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त एफआयआरमध्ये खून आणि हत्येचा प्रयत्न करण्याचे कलम देखील समाविष्ट केले आहेत.
  10. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांबद्दल फरीदाबाद गुन्हे शाखा आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांकडून माहिती मागवली आहे. प्राथमिक तपासात लाल किल्ला स्फोटात अमोनियम नायट्रेटचे अंश आढळून आले आहेत, परंतु एफएसएल अहवालानंतरच याची पुष्टी होईल. पहिला एफएसएल अहवाल आज अपेक्षित आहे.

Web Title : दिल्ली विस्फोट: 10 खुलासे सामने आए; फरीदाबाद मॉड्यूल कनेक्शन?

Web Summary : दिल्ली विस्फोट फरीदाबाद मॉड्यूल से जुड़ा, दस की मौत। एक संदिग्ध की पहचान के लिए डीएनए परीक्षण जारी हैं। सीसीटीवी के माध्यम से आई-20 कार का पता लगाया गया। विस्फोटक और यूएपीए आरोप दायर। पुलिस सभी कोणों की जांच कर रही है।

Web Title : Delhi Blast: 10 Revelations Emerge; Faridabad Module Connection?

Web Summary : Delhi blast linked to Faridabad module, killing ten. DNA tests are underway to identify a suspect. The I-20 car involved was traced via CCTV. Explosives and UAPA charges are filed. Police are investigating all angles.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.