शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

Kangana Ranaut: कंगनाच्या अडचणीत वाढ! दिल्ली विधानसभेने बजावले समन्स; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 6:47 PM

गेल्या अनेक दिवसांपासून कंगना एकामागून एक वादग्रस्त विधाने करत असून, आता दिल्ली विधानसभेने समन्स बजावत हजर राहण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली: बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आली आहे. कंगनाने केलेल्या विधानांवरून संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच आता शीख समाजासंदर्भात केलेल्या एका विधानावरून दिल्ली विधानसभेने कंगनाला समन्स बजावले असून, ६ डिसेंबर रोजी एका समितीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

अलीकडेच देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली. तसा प्रस्तावही केंद्रीय मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आला आहे. मात्र, पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे रद्द केल्याचा निर्णय कंगना रणौतला पटला नाही. त्यावर नाराजी व्यक्त करत कंगनाने शेतकरी आंदोलकांना खालिस्तानी दहशतवादी म्हटले होते. यानंतर पुन्हा एकदा कंगनाविरोधात देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. 

दिल्ली विधानसभेने बजावले समन्स

या वादग्रस्त वक्तव्यानंतर कंगनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून, आता तिला थेट दिल्ली विधानसभेने समन्स बजावले आहे. आमदार राघव चड्ढा यांच्या नेतृत्वाखाली समितीने सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टबाबत कंगनाला ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता हजर राहण्यास सांगतिले आहे. राघव चड्ढा यांच्या नेतृत्वाखाली शांती आणि सद्भाव संबंधी समितीने कंगनाला समितीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.   

काय म्हणाली होती कंगना?

पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे रद्द केल्यानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवरील स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली. यानंतर पुन्हा नवीन वाद निर्माण झाला. खलिस्तानी दहशतवादी आज शस्त्रास्त्रांच्या बळावर सरकारला प्रभावित करत असतीलही, पण एका महिलेला विसरून चालणार नाही. देशाच्या एकमेव महिला पंतप्रधानाने या खलिस्तानींना आपल्या चपलेखाली चिरडले होते. इंदिरा गांधींनी स्वत:च्या जीवाची किंमत देत यांना डासांसारखे चिरडलं आणि देशाचे तुकडे होण्यापासून वाचवले. इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतरही इतक्या दशकांपासून ते त्यांच्या नावाने थरथर कापतात. त्यांना असाच गुरु पाहिजे, असे कंगनाने म्हटले होते.  

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतdelhiदिल्ली