शहरं
Join us  
Trending Stories
1
Prithviraj Chavan : सांगलीच्या निकालातून धडा घेतला पाहिजे; पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला
2
Rohit Pawar पवार कुटुंबात तीन खासदार, दोन आमदार तरी ही घराणेशाही नाही; रोहित पवारांचा तर्क ऐका...
3
राज्य भाजपात मोठे बदल होणार?; दिल्लीत पार पडणार महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची बैठक
4
एसयुव्हींमधला डार्क हॉर्स! MG Gloster Black Storm सोबत ४०२ किमी सवारी; खऱ्या खुऱ्या SUVचे मायलेज किती असेल...
5
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
6
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
7
वायनाड की रायबरेली? निर्णय घेण्यासाठी राहुल गांधींकडे शेवटचा १ दिवस बाकी, अन्यथा...
8
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
9
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
10
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
11
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
12
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
13
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
14
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
15
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
16
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान
17
भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या मार्गात 'मोठा' अडथळा; कॅरेबियन बेटांवर महत्त्वाची घडामोड
18
T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप
19
'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय
20
Investment Post Office : ₹१०० ची पॉवर : ५ वर्षांत जमा कराल गॅरंटीड लाखोंचा फंड, समजून घ्या गणित

Delhi AIIMS: दिल्ली AIIMS च्या सर्व्हरवर चीनमधून सायबर अटॅक, गृह मंत्रालयाच्या रिपोर्टमध्ये खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 4:17 PM

Delhi AIIMS: हॉस्पिटलच्या 100 सर्व्हर्सपैकी 40 फिजिकल आणि 60 व्हर्चुअली हॅक करण्यात आले.

Delhi AIIMS Server Attack:दिल्लीतीलएम्स रुग्णालयात झालेल्या सायबर हल्ल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा सायबर हल्ला चीनमधून झाल्याचे सांगण्यात आले आहे. रुग्णालयाच्या 100 सर्व्हरपैकी 40 फिजिकल आणि 60 व्हर्चुअली सर्व्हर हॅक करण्यात आले आहेत. यापैकी पाच सर्व्हरचा डेटा हॅकर्सकडून यशस्वीपणे परत मिळवण्यात आला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MoHFW) बुधवारी (14 डिसेंबर) ही माहिती दिली.

25 नोव्हेंबर रोजी दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजेंस फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (IFSO) युनिटद्वारे खंडणी आणि सायबर दहशतवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) आता टार्गेट रॅन्समवेअर हल्ल्याची चौकशी करत आहे. एनआयएसोबतच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि दिल्ली सायबर क्राइम सेल, इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन, इंटेलिजन्स ब्युरो, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) देखील या सायबर हल्ल्याचा तपास करत आहेत.

एम्सवर सायबर हल्लाAIIMS दिल्लीने पहिल्यांदा 23 नोव्हेंबर रोजी आपल्या सर्व्हरमध्ये खराबी नोंदवली. सर्व्हर राखण्यासाठी नेमलेल्या दोन अधिकाऱ्यांना सायबर सुरक्षा उल्लंघनाच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले. एम्सच्या अधिकाऱ्यांनी एका निवेदनात म्हटले की, ई-हॉस्पिटल डेटा परत मिळवण्यात आला आहे. सेवा पुन्हा सुरू करण्यापूर्वी नेटवर्क क्लीन केले जात आहे. 

CFSL ची मदत घेतलीया महिन्याच्या सुरुवातीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एम्स (Delhi AIIMS) दिल्ली येथील संगणक सिस्टीमवर झालेल्या हल्ल्याची चौकशी सुरू केली होती. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल फॉरेन्सिक लॅब (CFSL) च्या टीमला मालवेअर हल्ल्याचा स्रोत ओळखण्यासाठी AIIMS दिल्लीच्या सर्व्हरची तपासणी करण्याची जबाबदारी दिली आहे.

टॅग्स :AIIMS hospitalएम्स रुग्णालयdelhiदिल्लीcyber crimeसायबर क्राइमchinaचीन