पीक, वंश वाचवण्यासाठी भाजपला पराभूत करा, शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 10:34 IST2022-02-10T10:34:07+5:302022-02-10T10:34:39+5:30

“शेतकरी समजदार असल्यामुळे कोणाला मत द्यावे हे त्याला  चांगले समजते.” टिकैत यांनी थेट कोणाचेही नाव न घेता आमची संघटना राजकीय नाही, असे त्यांनी म्हटले. 

Defeat BJP to save crops and tribes, appeals of farmer leader Rakesh Tikait | पीक, वंश वाचवण्यासाठी भाजपला पराभूत करा, शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे आवाहन

पीक, वंश वाचवण्यासाठी भाजपला पराभूत करा, शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे आवाहन

मुरादाबाद (उत्तर प्रदेश) : पीक आणि वंश वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाला पराभूत करा, असे आवाहन संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी येथे शेतकऱ्यांना केले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे ११ जिल्ह्यांतील ५८ जागांसाठीचे मतदान गुरुवारी होत असताना टिकैत यांनी हे आवाहन पत्रकार परिषदेत केले.

ते म्हणाले, “भाजपने शेतकऱ्यांचे शोषण केले म्हणून या निवडणुकीत त्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे.” संयुक्त किसान मोर्चाने ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी शेतकरी नेते योगेंद्र यादव उपस्थित होते. मोर्चाच्या नेत्यांनी स्पष्टपणे म्हटले की, भाजपने शेतकऱ्यांचे शोषण केले म्हणून या निवडणकीत त्याला दंड जरूर मिळायला हवा. केंद्र आणि राज्यातील भाजपचे सरकार सतत खोटे  बोलत आहेत आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न करीत आहेत. सरकारला जी भाषा समजते त्याच भाषेत आम्ही त्याला सांगू.

“शेतकरी समजदार असल्यामुळे कोणाला मत द्यावे हे त्याला  चांगले समजते.” टिकैत यांनी थेट कोणाचेही नाव न घेता आमची संघटना राजकीय नाही, असे त्यांनी म्हटले. 
 

Web Title: Defeat BJP to save crops and tribes, appeals of farmer leader Rakesh Tikait