द्रविड, सायना आणि प्रकाश पादुकोण यांची कोट्यवधींची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 18:55 IST2018-03-12T18:55:05+5:302018-03-12T18:55:05+5:30
भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि प्रकाश पादुकोण यांची एका कंपनीने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली...

द्रविड, सायना आणि प्रकाश पादुकोण यांची कोट्यवधींची फसवणूक
नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि प्रकाश पादुकोण यांची एका कंपनीने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या कंपनीने देशातील 800 जणांना चुना लावला आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार कर्नाटकातील बंगळुरूची असलेली विक्रम इनव्हेस्टमेंट या कंपनीनं भारतातील 800 जणांची फसवणूक केली आहे. या 800 जणांपैकी अनेकजण चित्रपट, खेळ आणि राजकारणाशी जोडले गेले आहेत. पोलिसांनी कंपनीचा मालक राघवेंद्र श्रीनाथ आणि एजंट म्हणून काम करणारा सुतराम सुरेश, नरसिम्हामूर्ती, केसी. नागराज आणि प्रल्हाद यांना अटक केली आहे.