शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

बदनामी खटला; दिलगिरीस राहुल यांचा नकार

By admin | Updated: November 27, 2015 00:31 IST

महात्मा गांधी यांच्या हत्येस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचा आरोप केल्याबद्दल भिवंडी येथील न्यायालयात सुरु असलेला बदनामीचा खटला दिलगिरी व्यक्त

नवी दिल्ली : महात्मा गांधी यांच्या हत्येस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचा आरोप केल्याबद्दल भिवंडी येथील न्यायालयात सुरु असलेला बदनामीचा खटला दिलगिरी व्यक्त करून मिटविण्यास काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात नकार दिला.राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून हा खटला हवे तर तुम्ही मिटवू शकता, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयात न्या. दीपक मिश्रा व न्या प्रफुल्ल चंद्र पंत यांच्या खंडपीठाने केली. मात्र अशी दिलगिरी व्यक्त करण्यास राहुल गांधी याच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी स्पष्ट नकार दिला. दिलगिरी मागून तडजोड करण्याऐवजी मुळात हा खटलाच कसा कायद्याच्या निकषांवर टिकणारा नाही, हे आपण अनेक न्यायनिर्णय व पुराव्यांच्या आधारे सिद्ध करू, असे सिब्बल यांनी सांगितले.गेल्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावातील प्रचारसभेत केलेल्या या विधानाबद्दल रा. स्व. संघाचे भिवंडी शहर कार्यवाह राजेश कुंटे यांनी तेथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात राहुल गांधींवर हा बदनामीचा फौजदारी खटला गुदरला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यास याआधीच ७ मे रोजी अंतरिम स्थगिती दिली आहे. राहुल गांधींनी आज घेतलेली भूमिका व भिवंडी न्यायालयाने त्यांना येत्या ९ जानेवारीस हजर राहण्याचे समन्स काढले आहे, हे लक्षात घेऊन खंडपीठाने अंतरिम स्थगिती यापुढेही सुरु ठेवली. मूळ फिर्यादी राजेश कुंटे यांनी राहुल गांधीच्या आव्हान याचिकेला चार आठवड्यांत उत्तर सादर करावे, असे सांगून खंडपीठाने सुनावणी १७ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)कुंटे यांनी दाखल केलेला खटला रद्द करावा यासाठी केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर राहुल गांधी सर्वोच्च न्यायालयात आले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)