'दीपवीर'च्या लग्नाच्या फोटोची स्मृती इराणींनाही उत्सुकता, शेअर केली 'ही' पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 09:13 IST2018-11-15T09:02:24+5:302018-11-15T09:13:51+5:30
अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा पारंपरिक कोंकणी पद्धतीने विवाह संपन्न झाला. इटलीतील लेक कोमो येथे नयनरम्य व्हिलामध्ये बुधवारी (14 नोव्हेंबर) हा सोहळा पार पडला.

'दीपवीर'च्या लग्नाच्या फोटोची स्मृती इराणींनाही उत्सुकता, शेअर केली 'ही' पोस्ट
नवी दिल्ली - अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा पारंपरिक कोंकणी पद्धतीने विवाह संपन्न झाला. इटलीतील लेक कोमो येथे नयनरम्य व्हिलामध्ये बुधवारी (14 नोव्हेंबर) हा सोहळा पार पडला. काही मोजक्याच नातलगांच्या आणि मित्र मैत्रिणीच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडला. मात्र 'दीपवीर'च्या लग्नाचे काही खास फोटो पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. लाडक्या जोडीच्या लग्नाची एक झलक पाहायला मिळावी यासाठी चाहते उतावीळ झाले आहेत. 'दीपवीर'च्या फोटोची अशीच उत्सुकता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनाही आहे. त्यामुळे त्यांनी या उत्सुकतेवर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक मजेशीर पोस्ट केली आहे.
Deepika Ranveer Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण अडकले लग्नबेडीत
स्मृती इराणी यांनी बागेतील बाकावर एक सांगाडा वाट पाहत बसला असल्याचा फोटो शेअर केला आहे. तसेच 'जेव्हा तुम्ही 'दीपवीर'च्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी फार काळ वाट पाहता...' अशी फोटोखाली मजेशीर कॅप्शन दिली आहे. स्मृती इराणींच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 'दीपवीर' चं लग्न अतिशय थाटामाटात झाले असून या लग्नाला प्रचंड सुरक्षा ठेवण्यात आली होती. लग्नातील कोणत्याही पाहुण्याला लग्न विधी अथवा लग्न परिसरातील कोणताही फोटो अथवा व्हिडिओ काढण्याची परवानगी नव्हती. दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ ते स्वतःच त्यांच्या फॅन्ससाठी शेअर करणार असल्याचे म्हटले जात आहे.