शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्या वादावर फैसला १७ नोव्हेंबरपूर्वी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 04:55 IST

मध्यस्थ मंडळाच्या माध्यमातून सहमतीचा तोडगा काढण्याचे प्रयत्न करायचे असतील तर ते तसे करू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादग्रस्त २.७७ एकर जमिनीच्या मालकीच्या वादातील अपिलांवर अतिम सुनावणी सुरु असली तरी यातील पक्षकारांना न्यायालयाने नेमलेल्या मध्यस्थ मंडळाच्या माध्यमातून सहमतीचा तोडगा काढण्याचे प्रयत्न करायचे असतील तर ते तसे करू शकतात, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. तसेच सर्व पक्षकारांनी १८ आॅक्टोबरपर्यंत युक्तिवाद पूर्ण करावा, असे आवाहनही न्यायालयाने केले आहे.ज्या पक्षकारांचा युक्तिवाद बाकी आहे त्यांच्या वकिलांना प्रत्येकाला किती वेळ लागेलयाचे वेळापत्रक देण्यास न्यायालयाने मंगळवारी सांगितले होते. ते बुधवारी सादर केले गेले. ते वाचून सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी १८ आॅक्टोबरपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सरन्यायाधीश १७ नोव्हेंबररोजी निवृत्त व्हायचे आहेत.त्याआधी निकाल देणे भाग आहे. आॅक्टोबरच्या मध्यापर्यंत सुनावणी संपल्यास महिनाभरात निकालपत्र तयार व्हायला अवधी मिळू शकेल. मध्यस्थीतून सकारात्मक निष्पन्न झाल्यास अपिलांऐवजी तडजोडीनुसार निकाल दिला जाऊ शकेल.सरन्यायाधीश यांच्या विशेष खंडपीठाने नमूद केले की, आमच्यासमोर दैनंदिन सुनावणी यापुढेही सुरू राहील. पण मध्यस्थ मंडळाच्या माध्यमामार्फत तोडगा काढण्याची पक्षकारांची इच्छा असल्यास ते तसे करू शकतात. सहमतीने तोडगा निघाला तर तो न्यायालयास कळवावा. मात्र या कामात गोपनीयता पाळावी लागेल.अंतिम सुनावणी सुरू करण्याआधी न्यायालयाने वाद मध्यस्थीने सुटतो हे पाहण्याचे ठरविले व त्यासाठी निवृत्त न्यायाधीश न्या. एफ. एम. आय कलिफुल्ला, आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर व ज्येष्ठ वकील श्रीराम पान्चू यांचे मध्यस्थ मंडळ नेमले. या मंडळाने बैठका घेऊन चर्चा केली. पण मध्यस्थीस यश न आल्याचा अहवाल मंडळने दिल्यानंतर न्यायालयाने नियमित सुनावणी सुरू केली.>दोन्ही प्रक्रिया एकाचवेळी सुरू राहणारसुमारे महिनाभर सुनावणी झाल्यानंतर सुन्नी वक्फ मंडळ व निर्मोही आखाडा यांनी मध्यस्थ मंडळास पत्र लिहून पुन्हा मध्यस्थीचा प्रयत्न करण्याची इच्छा असल्याचे कळविले. मध्यस्थ मंडळाने त्यावर काय करावे याबाबत निर्देश देण्याची विनंती केली असता न्यायालयाने वरील स्पष्टिकरण केले.गेल्या वेळी मध्यस्थीचे प्रयत्न सुरू असताना न्यायालयाने सुनावणी तहकूब ठेवली होती. मात्र आता मध्यस्थीचे प्रयत्न व सुनावणी दोन्ही सुरू राहील.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAyodhyaअयोध्या