शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

भाजप-टीडीपीमध्ये ठरलं! आंध्र प्रदेशमध्ये कोण किती जागा लढवणार? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 15:15 IST

लोकसभा निवडणुका काही दिवसातच होणार आहेत. याआधी सर्व पक्षांनी जारदार तयारी सुरू केली आहे. भाजपने आपल्या मित्रपक्षांसोबत जागावाटपाची चर्चा सुरू केली.

लोकसभा निवडणुका काही दिवसातच होणार आहेत. याआधी सर्व पक्षांनी जारदार तयारी सुरू केली आहे. भाजपने आपल्या मित्रपक्षांसोबत जागावाटपाची चर्चा सुरू केली. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे एनडीए आघाडीत पुनरागमन जवळपास निश्चित झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जागावाटपावर एकमत झाले आहे. आंध्र प्रदेशमध्ये भाजप चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्ष आणि पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षासोबत युती करून निवडणूक लढवणार आहे.  भाजप आणि जनसेना आंध्रच्या 8 लोकसभा आणि 30 विधानसभा जागांवर निवडणूक लढवू शकतात, तर टीडीपी 17 लोकसभा आणि 145 विधानसभेच्या जागांवर निवडणूक लढवू शकतात.

गडकरींना ऑफर देता, मग आम्ही नागपुरात लढायचे कसे?; ठाकरे-सुळेंवर काँग्रेस नाराज

शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी अमित शहा, जेपी नड्डा, चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण यांच्यात झालेल्या बैठकीत जागावाटपाचा करार झाल्यानंतर नायडूंचा एनडीए आघाडीत परतण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. हे तिन्ही पक्ष एनडीए आघाडीअंतर्गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा लवकरच युतीची घोषणा करू शकतात.

याआधी, ७ मार्च रोजी चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी आंध्र प्रदेशमध्ये युती आणि जागावाटपाबाबत चर्चा केली होती. दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये अनेकवेळा चर्चा  झाल्यानंतर नायडूंच्या एनडीए आघाडीत परतण्याच्या फॉर्म्युल्यावर सहमती झाली आहे.

नायडू माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळात एनडीए आघाडीत होते आणि ते पुन्हा एनडीएमध्ये सामील झाल्यानंतर भाजपला आंध्र प्रदेशात राजकीय फायदा होणार हे निश्चित आहे. मात्र या करारामुळे दक्षिण भारतातील इतर राज्यांमध्येही निर्माण झालेल्या वातावरणाचा फायदा भाजपला होऊ शकतो, असेही बोलले जात आहे.

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकAndhra Pradeshआंध्र प्रदेश