शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

भारतात रस्ते अपघातांमधील मृतांच्या आकड्यात मोठी घट, महाराष्ट्र पहिल्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 09:10 IST

रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या लोकांच्या मृत्यूच्या आकडेवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे.

ठळक मुद्दे रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या लोकांच्या मृत्यूच्या आकडेवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांमध्ये (जानेवारी ते सप्टेंबर) रस्ते अपघातातील मृतांचा आकडा ५ हजारांनी घटला आहे.

नवी दिल्ली- रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या लोकांच्या मृत्यूच्या आकडेवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांमध्ये (जानेवारी ते सप्टेंबर) रस्ते अपघातातील मृतांचा आकडा ५ हजारांनी घटला आहे. सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या रस्ते सुरक्षा समितीला राज्य सरकारांनी दिलेल्या माहितीमधून ही आकडेवारी समोर आली आहे. रस्ते अपघातांमधील मृतांची आकडेवारी राज्य सरकारांनी दिलेल्या माहितीवरुन समोर आली आहे. 

राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीवरून टक्केवारीनुसार पंजाब पहिल्या क्रमांकावर आहे. पंजाबमधील रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांचं प्रमाण 14.4 टक्क्यांनी घटलं आहे. तर त्यानंतर पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. पश्चिम बंगालमध्ये रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 13.7 टक्क्यांनी घटलं आहे. अपघातातील मृतांचा घटलेला आकडा लक्षात घेतल्यास महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. गेल्या वर्षातील पहिल्या तीन तिमाहींचा (जानेवारी ते सप्टेंबर) विचार करता, यंदाच्या वर्षात महाराष्ट्रात रस्ते अपघातातील मृतांची संख्या 807 ने कमी झाली आहे. यानंतर गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात रस्ते अपघाताताली मृतांची संख्या 775 ने कमी झाली आहे. केंद्रशासित प्रदेशांच्या आकडेवारीनुसार, राजधानी दिल्लीत अपघातांमध्ये मृत पावलेल्यांची संख्या 1 हजार 93 इतकी आहे. गेल्या वर्षी हाच आकडा 1 हजार 212 इतका होता. तर चंदिगढमधील रस्ते अपघातात दगावलेल्यांच्या संख्येत 25.2 टक्क्यांची घट झाल्याचं नोंदविण्यात आलं आहे.

दुसरीकडे बिहारमधील परिस्थिती चिंताजनक असल्याचं निदर्शनास आलं आहे. बिहारमध्ये यावर्षी अपघातांमध्ये मृत्यू झालेल्यांचा आकडा 378 ने वाढला आहे. यानंतर या यादीत ओडिशाचा क्रमांक लागतो. ओडिशात 2016 मधील पहिल्या नऊ महिन्यांमध्ये रस्ते अपघातात 3 हजार 306 जणांचा बळी गेला होता. यंदा हा आकडा वाढला असून 3 हजार 495 इतका झाला आहे.

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात रस्ते दुर्घटनेमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये झालेली घट ही राज्यांकडून केलेल्या योग्य उपाययोजनांचं उदाहरण आहे. अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही कटीबद्ध होतो, असंही ते पुढे म्हणाले. रस्त्यावर झालेल्या अपघातामुळे व्यक्तीच्या होणाऱ्या मृत्यूचा त्याच्या संपूर्ण कुटुंबावर परिणाम होतो. विविध संघटनांच्या माध्यमातून आम्ही रस्ते अपघात टाळायला जागृकता निर्माण केली, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.  

टॅग्स :AccidentअपघातIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र